फक्त 'ती' गोष्ट सहन झाली नाही आणि समलैंगिक संबंध असलेल्या पार्टनरलाच तरूणाने संपवलं!
नेहमी एकत्र राहणाऱ्या दोन तरुणांचं एकमेकांवर प्रेम जडलं परंतु, अचानक त्यांच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली. त्या तिसऱ्या व्यक्तीमुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तिसऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन तुरुंगात गेला. नेमकं घडलं काय?

बातम्या हायलाइट

दोन्ही मित्रांचं जडलं एकमेकांवरच प्रेम

समलैंगिक संबंधात अचानक तिसऱ्याची एन्ट्री

पण एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तिसऱ्या व्यक्तीसोबत तुरुंगात...
Crime news: दिल्लीच्या मधुविहार परिसरातील एका इमारतीत दोन मित्र भाड्याच्या घरात राहत होते. मात्र, या दोन तरुणांमधील सामान्य मैत्रिचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्या दोघांचं एकमेकांवरच प्रेम जडलं. जगाच्या नजरेत हे दोघे केवळ मित्र असले तरी खऱ्या आयुष्यात ते एका प्रियकर आणि त्याच्या प्रेयसीसारखे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतु, अचानक त्यांच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली. यानंतर दोन्ही मित्रांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्या तिसऱ्या व्यक्तीमुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तिसऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन तुरुंगात गेला. नेमकं काय घडलं?
पैशाच्या कारणामुळे नात्यात दुरावा
खरंतर, ही कहाणी रेहान आणि करण नावाच्या दोन मित्रांची आहे. करण हा ट्रान्सजेंडर असून रेहानसोबत त्याचे नातं अगदी प्रेमी-प्रेयसीसारखे होतं. गेल्या चार महिन्यांपासून दोघेही पूर्व दिल्लीतील मधु विहार परिसरातील एका घरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून रेहान आणि करणच्या नात्यात पैशाच्या कारणामुळे दुरावा निर्माण झाला. रेहानने करणकडून वारंवार पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे करणने त्याच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, रेहानला त्यांच्या नात्यातील अंतर सहन होत नव्हतं. करण आपल्याला फसवत असल्याचं रेहानला वाटलं. म्हणून, त्याने त्याचा मित्र मोहम्मद सरवरसोबत करणच्या विरोधात एक कट रचला.
मित्राच्या मदतीने केला करणचा खून
प्लॅनिंगप्रमाणे, 3 ऑगस्टच्या रात्री रेहान आणि सर्वर एका बहाण्याने करणला टेल्को टी-पॉइंटवर घेऊन गेले. तिथे दोघांनीही करणवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. करणचा श्वास थांबेपर्यंत रेहान आणि त्याचा मित्र चाकूने वार करत राहिले. हत्येनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने एका तरुणाचा मृतदेह झुडपात पडलेला पाहिला आणि तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत कळवलं. घटनास्थळी पोहचताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी तो पाठवण्यात आला. तसेच, या प्रकरणासंदर्भात हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा: जळगावात चड्डी गँगची दहशत! अर्धनग्न अवस्थेत मंदिरातून पादुका, दानपेटीतील रक्कम चोरली अन् घरात सुद्धा...
आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश
तपासाच्या काही तासांतच, क्राइम ब्रांचकडून या हत्येबद्दल हा धक्कादायक खुलासा करण्यात आला. त्यानंतर, आरोपींच्या शोधात छापे टाकण्यास पोलिसांनी सुरुवात केली. त्यांना अटक करण्यासाठी ट्रान्स-यमुना ते गाझियाबादपर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले, परंतु दोघेही पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, ते दोन्ही आरोपी पूर्व दिल्ली परिसरात येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. अखेर काल रात्री 12:45 च्या सुमारास शकरपूर उड्डाणपुलाजवळ दोघांनाही अटक करण्यात आली.
हे ही वाचा: टॉयलेट क्लीनर पाजलं आणि पत्नीलाच संपवलं, हत्येपूर्वी मौलानाने केली बेदम मारहाण अन् मृतदेह...
चौकशीदरम्यान दोघांनीही करणच्या हत्येची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे प्रकरणाती आरोपी रेहान उर्फ इक्का फक्त 19 वर्षांचा तर मोहम्मद सर्वर केवळ 20 वर्षांचा असल्याची माहिती आहे.