Extra Marital Affair Shocking News : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी छोटू विश्वकर्माची हत्या कोणी केली आणि यामागचं कारण काय होतं? पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत म्हटलंय की, छोटूच्या मोठ्या भावानेच त्याची हत्या केली आहे.
ADVERTISEMENT
याबाबत सविस्तर वृत्त असं की, औरंगाबाद जिल्ह्यातील हसपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या महमदपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादाकय माहिती उघड केली आहे. लहान भावाच्या घाणेरड्या कृत्यांना वैतागून मोठा भाऊ रविरंजनने गोळी मारून त्याची हत्या केली.
मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध
एसडीपीओ अशोक कुमार दास यांनी म्हटलंय की, अटक केलेल्या आरोपी रविरंजनने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. तसच पोलिसांनी त्याचे निशाण असलेले जिवंत काडतूस आणि बंदूकही जप्त केली आहे. याचा वापर हत्येचा गुन्हा करण्यासाठी करण्यात आला होता. त्यांनी म्हटलंय की, रविरंजनवर मोठं कर्ज होतं. त्याच्या पत्नीसोबत छोटूचे अनैतिक संबंध होते. यामुळे तो खूप नैराश्यात होता.
हे ही वाचा >> 'दिल्लीत दोघेजण भेटले आणि त्यांनी 160 जागांची गॅरंटी दिली अन्...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
ही धक्कादायक घटना कधी घडली?
2 ऑगस्ट रोजी छोटू घरच्या बाल्कनीत झोपला होता. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. पण ही हत्या नेमकी कोणी केली? या हत्येमागचं कारण काय? लोकांना असे अनेक प्रश्न पडले होते. पोलिसांनी घटनेची माहिती उघड केल्यावर सर्वांना या घटनेमागचं रहस्य कळलं.
त्या ठिकाणीही घडली होती भयंकर घटना
उत्तर प्रदेशमध्ये एका 28 वर्षीय तरुणाची चाकूने वार करुन आणि नंतर गोळी मारून हत्या करण्यात आली होती. पीडित तरुणाच्या पत्नीने तिचा प्रियकर म्हणजेच तिच्या दीरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला होता. गुरुवारी 7 जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. मैफरीन असं मृत व्यक्तीचं नाव होतं. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली होती.
हे ही वाचा >> मुंबईतील सुंदर महिलेचा तो कारनामा अन् एक्स बॉयफ्रेंडला... शरीरसंबंध की भलतंच काही...
ADVERTISEMENT
