बेवड्या बायकोनं नवऱ्याला भररस्त्याच लाथा बुक्क्यांनी केली मारहाण, उपस्थितांचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

crime news : एका महिलेनं दारू पिऊन आपल्याच पतीला मारहाण केली आहे. हे पाहून घटनास्थळी उपस्थितांचा गोंधळ उडाला आहे.

crime news (grok)

crime news

मुंबई तक

• 04:55 PM • 10 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीने दारू पिऊन पतीला केली मारहाण

point

घटनास्थळी उपस्थितांचा गोंधळ उडाला

crime news : आपण आतपापर्यंत पत्नीने दारू पिऊन पतीला मारहाण केल्याचं अनेकदा ऐकलं होतं. मात्र, एका महिलेनं दारू पिऊन आपल्याच पतीला मारहाण केली आहे. हे पाहून घटनास्थळी उपस्थितांचा गोंधळ उडाला आहे. हे चित्र पाहून घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात घडली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : "तुला स्वयंपाक येत नाही चल घरून 20 लाख घेऊन ये..." पुण्यात हुंड्यासाठी छळ अन् अखेर पीडितेनं...

महिलेनं मद्यधुंद अवस्थेत पतीला केली मारहाण

घडलेल्या घटनेनुसार, पती-पत्नीमध्ये कशावरून काही कारणावरून वाद झाला, त्यानंतर रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत पत्नीने पतीचे केस धरले आणि शिवीगाळही केली. त्यानंतर महिलेनं मद्यधुंद अवस्थेत आपल्याच पतीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पत्नीचा राग शांतच होत नव्हता, असे सांगण्यात येते.

घटनास्थळी लोकांचा उडालेला गोंधळ पाहून अनेक लोकांनी गर्दी केली. त्यानंतर, पोलिसही त्या ठिकाणी दाखल झाले. परंतु एकही महिला पोलीस त्या ठिकाणी उपस्थित राहिली नाही, त्यामुळे पुरूष पोलीस हे मद्यधुंद महिलेला पकडण्यास असमर्थ राहिले, पण महिलेला थांबवण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.

हे ही वाचा : Govt Job: आता सरकारी बँकेत नोकरी मिळणं सोप्पं... 'या' बँकांमध्ये तब्बल 17000 हून अधिक पदांसाठी भरती!

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीनुसार, हाय व्होल्टेज ड्रामा बराच वेळ सुरु होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत दिसते की, ती महिला तिच्या पतीचे केस धरून त्याला जोरात कानशीलात देते. तर जवळ उभे असलेले लोक हे तमाशा पाहू लागतात. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

    follow whatsapp