crime news : देशभरात अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्समध्ये विशेष वाढ होताना दिसते. याच एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्समुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशीच एक घटना ओडिशात गंजाल जिल्ह्यात उघडकीस आली. एक व्यक्ती विवाहित असूनही त्याने दोन परस्त्रियांसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. त्याला त्याच्या बायकोसोबत राहायचे नव्हते. त्याच्या अनैतिक संबंधामध्ये बायको अडथळा ठरत असल्याने त्यानं बायकोचाच खून केला. पतीचं नाव संतोष नायक वय (30), अनीता नायक वय (26) आणि श्रुती परीडा (वय 21) अशी अटकेत असल्यांची नावे आहेत. तर मृत पत्नीचे नाव पूजा नायक असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नात्याला काळीमा! रक्षाबंधन दिवशीच भावाने केला बहिणीचा खून, कारण ऐकून हादरून जाल
नेमकं प्रकरण काय?
ही घटना गंजात जिल्ह्यातील असून या खूनाला आत्महत्येचं स्वरुप देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. बेलागुंठा पोलिसांनी या प्रकरणात तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. एक पती तर दोन त्याच्या प्रेयसींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आरोप आहे की विवाहित व्यक्ती आपल्या दोन्ही गर्लफ्रेंडसोबत राहू लागला होता. पत्नी अडथळा निर्माण करत होती, तिलाच हटवण्यासाठी त्याने टोकाचं पाऊल उचललं.
परंतु आरोपी पती संतोष नायकने पत्नीने आत्महत्या केल्याचं खोटं सांगितलं. मृत व्यक्ती अनीता नायक यांची आई शांती नायक यांना घरात जाऊ दिलं नाही. त्यांनी महिलेचा मृतदेह कपड्यात गुंडाळला. त्यानंतर संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दोन महिलांशी अनैतिक संबंध
शांती नायक यांनी आरोप केला की, संतोषचे इतर दोन महिलांशी अनैतिक संबंध सुरु होते. तक्रारीत म्हटलं की, या संबंधित तिघांनी मिळूनच आमच्या मुलीचा खून केला आहे. पण पीडितेनंच आत्महत्या केल्याचा बनाव रचल्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा : सनी लिओनी असं काय बोलली की, प्रचंड चर्चेत आली? बड्या नेत्याला सुनावलं!
बेलागुंठा पोलीस ठाण्याचे प्रभारी रेवाती साबर यांनी पोलिसांचे घटनास्थळी पथक तैनात करण्यास सांगितले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. काही पुराव्यातून तपास केल्यानंतर समजते की, आरोपीचा मृत्यू केवळ मृत्यू नसून हा खून आहे. या खूनाला बनावट आत्महत्येचा रंग दिला जात होता. संबंधित प्रकरणात तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
