सनी लिओनीने ट्रम्प यांना थेट सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाली
Donald Trump and Sunny Leone: डोनाल ट्रम्प यांनी 50% कर लादल्यानंतर भारत आणि अमेरिकेत तणाव वाढत आहे. दरम्यान, अभिनेत्री सनी लिओनने डोनाल्ड ट्रम्पच्या राजकारण करण्याच्या शैलीवर तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात आयात-निर्यात आणि त्यावरून लादले जाणारे कर यावरून बराच संघर्ष सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% कर लादल्यानंतर, ट्रम्प यांच्यावर केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेत देखील जोरदार टीका होत आहे. दरम्यान, अभिनेत्री सनी लिओनी हिने देखील डोनाल्ड ट्रम्प यांना खडे बोल सुनावले आहेत. बीबीसीशी बोलताना ट्रम्पबद्दल विचारलेल्या प्रश्नावर तिचे मत तिने सविस्तरपणे व्यक्त केलं.
सनी लियोनीने अत्यंत समर्पक शब्दात ट्रम्प यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिला वाटते की ट्रम्प काही बाबतीत बरोबर आहेत, परंतु काही गोष्टी पाहता असे दिसते की त्यांच्या गोष्टी समजण्यापलीकडे आहेत आणि सहन करणे कठीण आहे.
हे ही वाचा>> स्मिताने बिकिनी फोटो केले शेअर, 'पप्पी दे पारूचा' हॉट लूक... विषय हार्ड!
कॅलिफोर्नियामध्ये ट्रम्प विरोधात वातावरण...
सनी लिओनी म्हणाली की, 'कोविड दरम्यान आमच्या घरात एक नियम होता. तेव्हा मी कॅलिफोर्नियामध्ये राहत होते, जिथे वातावरण ट्रम्प विरोधात होते. आम्ही ठरवले होते की, जेव्हा-जेव्हा आपण मित्रांना आमंत्रित करतो किंवा इतर कोणतंही गेट-टुगेदर असतं तेव्हा आपण राजकारणाबद्दल बोलणार नाही. राजकारणाची चर्चा सुरू होताच मैत्री धोक्यात येते.'
'सध्याचा काळ असा आहे की, प्रत्येकजण या बाजूचा किंवा त्या बाजूचा असतो. आजकाल कोणताही मधला मार्ग नाही. लोक त्यांचा द्वेष करतात किंवा त्यांना ते पूर्णपणे आवडतात. मध्यम मार्ग अशी काहीही गोष्टच नाही. मी या प्रश्नाला थोडे वळवू इच्छितो. मला फक्त अशी आशा आहे की आपण त्या युगात परत जाऊ जिथे आपण आपल्या नेत्यांवर प्रेम करायला लागू.'










