गरोदर बायकोचा मृतदेह घरात ठेवून नवऱ्याने पळ काढला, आई रक्ताच्या थारोळ्यात असताना चिमुकली मिठी मारुन बसली

मुंबई तक

17 Feb 2026 (अपडेटेड: 17 Feb 2026, 09:51 AM)

Crime News : मूळची बिहारमधील नालंदा येथील रहिवासी असलेली 22 वर्षीय चांदनी हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी विपिन याच्याशी झाला होता. त्यांना दीड वर्षांची एक मुलगी आहे. चांदनी चार महिन्यांची गर्भवती होती. विपिन मजुरीचे काम करत होता. पंधरा दिवसांपूर्वीच तो खोड़ा येथील नवनीत विहार परिसरात पूनम नावाच्या महिलेच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत भाड्याने राहायला आला होता.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गरोदर बायकोचा मृतदेह घरात ठेवून नवऱ्याने पळ काढला

point

आई रक्ताच्या थारोळ्यात असताना चिमुकली मिठी मारुन बसली

Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील खोड़ा परिसरात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली. चार महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचा मृतदेह तिच्या भाड्याच्या खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा मृतदेह तब्बल दोन दिवस खोलीत पडून होता आणि तिची दीड वर्षांची निष्पाप मुलगी आईच्या छातीशी बिलगलेली होती. घटनेनंतर पती फरार झाला असून, माहेरच्या नातेवाईकांनी ही हुंडाबळीची घटना असल्याचा आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

मूळची बिहारमधील नालंदा येथील रहिवासी असलेली 22 वर्षीय चांदनी हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी विपिन याच्याशी झाला होता. त्यांना दीड वर्षांची एक मुलगी आहे. चांदनी चार महिन्यांची गर्भवती होती. विपिन मजुरीचे काम करत होता. पंधरा दिवसांपूर्वीच तो खोड़ा येथील नवनीत विहार परिसरात पूनम नावाच्या महिलेच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत भाड्याने राहायला आला होता.

हेही वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार? तारीखही ठरली, फक्त औपचारिकता बाकी

शेजारीण प्रमिला हिने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून चांदनी व तिची मुलगी घराबाहेर दिसत नव्हत्या. दरम्यान रविवारी सायंकाळी चांदनीचा दीर नितीन उर्फ नितीश हा त्या खोलीत आला. तो काही वेळ आत गेला आणि घाईघाईने बाहेर पडून निघून गेला. यानंतर त्याने चांदनीच्या बहिणीला घटनेची माहिती दिली.

चांदनीची बहीण तात्काळ खोलीत पोहोचली असता, आतून तीव्र दुर्गंधी येत होती. खोलीत प्रवेश करताच चांदनी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या डोक्याभोवती सुकलेले, काळे पडलेले रक्त होते. हृदय पिळवटून टाकणारे दृश्य म्हणजे तिची दीड वर्षांची मुलगी आईच्या छातीशी बिलगून झोपलेली होती. नातेवाईकांनी मुलीला उचलून सुरक्षित केले आणि तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत संपूर्ण घटनेची व्हिडिओग्राफी केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पॅनेलमार्फत शवविच्छेदन करण्यात आले असून, अहवालाची प्रतीक्षा आहे.

चांदनीचे वडील सुनील केवट हे सध्या लोनी येथे राहतात. रविवारी रात्री बिहारमधून त्यांच्या पत्नीचा फोन आल्यानंतर त्यांना घटनेची माहिती मिळाली. ते तातडीने मुलीच्या घरी पोहोचले; मात्र तोपर्यंत पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला होता. त्यांना मुलीचा चेहराही पाहता आला नाही, अशी वेदनादायक माहिती त्यांनी दिली. आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ करून खून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर प्रकरणात पती विपिन फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे खोड़ा परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईतील शिवाजीनगर परिसरात दुपारी गोळीबार, बॉयफ्रेंडशी जवळीकता साधत होती तरुणी, गर्लफ्रेंडनं झटक्यात केलं खल्लास