Crime news : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये व्हायरल झालेल्या एका अश्लील व्हिडिओची काही दिवसांपासून एकच चर्चा होताना दिसत आहे. त्यानंतर त्या युवतीचा दौसा येथील आणखी एक व्हिडिओ पॉर्नसाईटला देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित युवती आणि व्हिडिओ शूट करणाऱ्या साथीदाराला नोएडा येथील फ्लॅटवरून पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
न्यायालयाने जामीन केला मंजूर
बुधवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. न्यायालयाने त्या दोघांचाही जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात तिचे नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्ती त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, मुलीला चांगलं शिक्षण देण्यासाठी कर्ज घेतलं होतं. ते आजही कर्ज फेडू शकले नाहीत. त्यांना आपल्या मुलीबद्दल समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
दरम्यान, तरुणी ही सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होती. नोकरी करताना तिची काही महिला, तरुणींसोबत मैत्री झाली. त्या मित्र मैत्रिणींनी एका रात्रीत लाखो रुपये कसे कमावता येतील, याचा चुकीचा मार्ग सांगितला. तरुणीने कोणताही विचार न करता चुकीचा मार्ग स्वीकारला आहे.
तरुणी ही बिहारच्या शानूसोबत अनेकदा कारमध्ये फिरायची. रस्त्याच्या मध्येच काही अज्ञातांपुढे कार थांबवून त्या तरुणांना खुनवायची, इशारे करायची. त्यानंतर अज्ञातांसोबत अश्लील कृत्य करायची. अशातच तिने एका वृद्ध पुरूषासोबत अश्लील वर्तन केलं होतं. त्या अज्ञान वृद्धाची इज्जत लुटण्याचं काम केलं होतं. तिचा आणि अज्ञात वृद्धाचा व्हिडिओ आता पॉर्नसाईटवर देण्यात आला आहे. जिकडे तिकडे याच व्हिडिओची चर्चा होताना दिसते. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तरुणी आणि तिच्या साथीदार तरुणाचा पाठलाग केला. ते नुकतेच जैसलमेरमधील कुलधारा आणि सॅम सँडियन्स येथे गेले होते. तिथे त्यांनी अनेक अश्लील व्हिडिओ शूट केले होते. मात्र, त्यांचा यातील कोणताही व्हिडिओ समोर आलेला नाही.
दौसा येथील व्हिडिओ व्हायरल
तरुणीचा राजस्थानमधील दौसा येथील व्हिडिओ मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुणीने एका तरुणाला ठिकाणाचा पत्ता विचारण्याचा बहाना केला. त्यानंतर तिने त्या संबंधित तरुणाशी अश्लील वर्तन केलं. हे सर्व तिच्या साथीदाराने व्हिडिओ शूट करत रेकॉड केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबई शहर आणि उपनगरात धो धो पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यात सोसाट्याचा वारा घोंगावणार
या प्रकरणात तरुणीच्या कुटुंबियांनी जबाब दिला. ते म्हणाले की, मुलीला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. दरम्यान, कुटुंबार कर्जाचा बोजा आहे. अशा परिस्थितीत मुलीचे अशा कृत्याने कुटुंब हादरलेलं आहे. जैसलमेरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तरुण आणि तरुणी चांगल्या कुटुंबातील आहेत. दोघांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्यामुळे तर असं केलं नसेल ना? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. अशातच तरुण आणि तरुणी थायलंडलाही गेले होते. तिकडे जाऊन त्यांनी एका निर्जनस्थळी जाऊन असंच कृत्य केलं होतं. अशावेळी तिच्या साथीदाराने व्हिडिओ शूट केला.
ADVERTISEMENT
