रशियन, इंडियन आणि... सगळा रेट ठरलेला, WhatsApp वर मिळायच्या तरुणी; नंतर सुरू व्हायचा घाणेरडा खेळ

Crime News : कानपूरच्या कल्याणुपर पोलीस ठाणे हद्दीत ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला  आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

14 Jul 2025 (अपडेटेड: 14 Jul 2025, 09:59 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'या' ठिकाणी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

point

व्हॅट्सअॅपद्वारेच व्हायचं सर्वकाही

 Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये काही लोकांच्या व्हॅट्सअॅपवर सुंदर मुली हव्या असतील तर हा ग्रुप जॉइन करा, अशा आशयाचे अनेक मेसेजद्वारे सेक्स रॅकेट सुरू होतं. कानपूरच्या कल्याणपुर पोलीस ठाणे हद्दीत ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एक टोळी व्हॅट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क करायची. तरुणींचे रेट्स आणि फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले जात होते. 

हे वाचलं का?

हेही वाचा : तोंडाला काळं फासलेले प्रवीण गायकवाड नेेमके कोण आहेत?

पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

ग्राहकांना शरीरसंबंध ठेवण्यासाठी खोलीची सुविधा न झाल्यास ही टोळीच ग्राहकाला खोली उपलब्ध करून द्यायची. मात्र, एके दिवशी पोलिसांनीच या ठिकाणी छापा टाकला. यामुळे पोलिसांना क्यूबिकलचीही माहिती झाली. दोन तासांसाठी क्यूबिकलचे 500 रुपये आकारले जात होते अशी माहिती आता समोर आली. 

देसींसह रशियन मुलींची सर्व्हिस 

केवळ देशीच नाही, तर रशियन तरुणीही उपलब्ध करून दिल्या जात होत्या. या व्यतिरिक्त काही कॉलेजच्या तरुणींचाही यामध्ये मावेश होता. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने दोन महिला, सात ग्राहक, एक तरुणी आणि दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. यावेळी पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर अनेक वस्तू जप्त केल्या. 

संबंधित जागा ही देहविक्रीसाठीच सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली. दरम्यान, संबंधित सेक्स रॅकेटची माहिती पोलिसांना मिळताच, एडीसीपी कपिल सिंह यांनी संबंधितांवर अवैध व्यापाराच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा : नराधमाने मित्राच्या पत्नीलाही सोडलं नाही, मुंबई पोलीस उपनिरिक्षकाच्या पत्नीला 'त्या' रात्री केली जबरदस्ती

संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. या सेक्स रॅकेटमध्ये कोण कोण आहे? गेली किती वर्षांपासून हे सेक्स रॅकेट सुरू होतं? असा खोल तपास पोलीस करत आहेत.   

    follow whatsapp