Crime News : सायबर सिटी गुरुग्रामच्या सेक्टर 69 मधून एक भयानक घटना समोर आली आहे. त्रिपूरा येथील एका बीएससी बॉयोटेक विद्यार्थिनीवर तिच्या लिव्ह-इन पोर्टनर शिवमने क्रूरतेची परिसीमा ओलांडली आहे. पीडितेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत आरोपीने तिला तीन दिवस बंदी बनवून, तिच्या गुप्तांगांवर सॅनिटायझर ओतले आणि नंतर आग लावली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : धाराशिव : चार दिवसांपूर्वी साखरपुडा, मेहंदीचा रंग उतरण्याआधीच नवरदेव अन् नवरी मुलीवर काळाचा घाला
त्यानंतर पीडिता सफरदजंग रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. दिलेल्या जबाबात तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी तिने सांगितली होती. सप्टेंबर 2025 मध्ये, तरुणी आणि शिवम एका डेटिंग अॅपद्वारे मैत्री करू लागले, ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
सेनिटायझर ओतून गुप्तांग जाळलं
16 जानेवारी 2026 रोजी पीडितेचा छळ सुरु झाला, आरोपीने तिच्या डोक्यात स्टिलच्या बाटीलीने हल्ला केला होता. तिचे डोके भींतीवर आणि कपाटावर आदळले, तसेच तिच्या पायांवर वार केले. आरोपीने तिच्या गुप्तांगांवर सॅनिटायझरने स्प्रे करून त्याला आग लावत क्रूरतेचा कळस गाठला. नंतर आरोपीने पीडितेचे लग्न व्हिडिओ बनवले आणि तिला आई होण्याच्या स्थितीत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली.
पीडितेनं आईला सांगितला घटनाक्रम
या घटनेदरम्यान पीडितेने 18 फेब्रुवारीच्या रात्री आरोपीच्या फोनवरून तिच्या आईला फोन केला. घडलेला सर्व प्रकार सांगितला. आईने 112 वर फोन करून सूचना दिली, ज्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी दाखल पीडितेला सोडवले.
हे ही वाचा : मामीसह तिच्या मुलीला भाच्याने गळा दाबून संपवलं, मृतदेह बेडमध्ये भरून ठेवला
मुलीची परिस्थिती बघून रुग्णालयात आई हमसून हमसून रडू लागली होती. पोलिसांकडे मागणी केली की आरोपी शिवमवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना माहिती नव्हतं की आपली मुलगी शिवमसोबत राहत होती. पोलिसांनी शिवमला ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT











