Crime News : प्रेयसीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून करून मृतदेह ड्रममध्ये लपवला, या प्रकरणी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश-16 यांनी सोमवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, या प्रकरणी आरोपीला 55 हजार रुपयांचा दंड ठोठावला. आरोपी प्रियकराचे नाव सुभाष कुमार असे आहे, तर मृत पतीचे नाव राकेश साहनी आणि पत्नीचे नाव राधा देवी असे होते. अनैतिक प्रेमसंबंधातून सुभाषने राधाचा पती राकेश साहनीची हत्या केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : डोंबिवलीत डॉक्टरचे नर्सशी विवाहबाह्य प्रेमसंबंध, 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न
नेमकं काय घडलं?
पती राकेशच्या हत्येनंतर सुभाषने त्याचा मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कुजवण्यासाठी एका ड्रममध्ये भरून ठेवले होते. न्यायालयाने त्याच्या हत्येसाठी जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल 5 हजार असे मिळून 55 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणी सरकारी वकील अरविंद कुमार यांनी न्यायालयासमोर पुरावे सादर केले.
पत्नीच्या अवैध प्रेमसंबंधातून पती राकेशची हत्या
दरम्यान, या प्रकरणात राकेशचा भाऊ दिनेश सहानी याने 19 सप्टेंबर 2021 रोजी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. संबंधित तक्रारीत त्याने वहिणी राधा देवी, मेहुणी कृष्णा देवी, तसेच राकेशचे मेहुणे विकास कुमार आणि सुभाष कुमार यांची नावे घेतली. एफआरआयनुसार, राधाचे सुभाष कुमार या तरुणाशी अवैध प्रेमसंबंध होते, याला पती राकेशने विरोध केला होता, याचमुळे ही हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा : पुणे : बिल्डरच्या फसवणुकीमुळे सेवानिवृत्त अधिकारी नैराश्यात, सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
ड्रममध्ये तुकडे आढळले
दरम्यान, 18 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास राधा राहत असलेल्या खोलीत स्फोट झाला. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि हत्येचा खुलासा केला. 18 सप्टेंबर 2021 रोजी एका ड्रममध्ये तुकडे आढळून आले, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या घटनेनंतर सुभाषला पोलिसांनी अटक केली.
ADVERTISEMENT











