'त्या' बहि‍णींच्या मृत्यूचे गूढ वाढले, दोघींना तांत्रिकाकडे का नेण्यात आले? आईचा खळबळजनक आरोप

Crime News : राजस्थानमधील जोधपूर येथील सूरसागर परिसरातून एक हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्या घरात दोन सख्ख्या बहिणींच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती आणि मेंदीचा उत्साह ओसंडून वाहत होता, त्याच घरात दोन्ही बहिणींचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. हे लग्न होण्याआधी दोघींचा दुसऱ्या ठिकाणी साखरपुडा झाला होता. मात्र तो मोडला. त्यानंतर त्या दोघी बहिणी आजारी होत्या. मात्र त्यांना दवाखान्यात न नेता तांत्रिकांकडे का नेण्यात आले या प्रश्नाचा शोध आता पोलिस घेत आहेत.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 08:11 AM • 24 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'त्या' बहि‍णींच्या मृत्यूचे गूढ वाढले

point

दोघींना तांत्रिकाकडे का नेण्यात आले?

point

आईचा खळबळजनक आरोप

Crime News : राजस्थानमधील जोधपूर येथील सूरसागर परिसरातून एक हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्या घरात दोन सख्ख्या बहिणींच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती आणि मेंदीचा उत्साह ओसंडून वाहत होता, त्याच घरात दोन्ही बहिणींचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. हे लग्न होण्याआधी दोघींचा दुसऱ्या ठिकाणी साखरपुडा झाला होता. मात्र तो मोडला. त्यानंतर त्या दोघी बहिणी आजारी होत्या. मात्र त्यांना दवाखान्यात न नेता तांत्रिकांकडे का नेण्यात आले या प्रश्नाचा शोध आता पोलिस घेत आहेत. यामुळे या दोघी बहिणींच्या हत्येचे गूढ वाढले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : सांगली : पोटच्या दोन लेकरांना 20 हजाराला विकले, पाच दिवसांच्या मुलीची विक्री करताना आई सापडली

लग्नाआधीच दोन्ही बहि‍णींचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री घरात लग्नाचा जल्लोष सुरू होता, नाच-गाणी आणि मेंदी चालू होती. मात्र, पहाटे ३ च्या सुमारास अचानक दोन्ही बहिणींचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेची माहिती पोलिसांना त्वरित देण्याऐवजी कुटुंबीय पहाटेपर्यंत मृतदेहापाशीच बसून राहिले. सकाळी ५ वाजता जेव्हा मुलींच्या मामाला ही माहिती कळाली, तेव्हा त्यांनी पोलिसांना पाचारण केले. यामुळे या मृत्यूंबाबत संशयाचे जाळे अधिक गडद झाले आहे.

तांत्रिकाकडे का नेण्यात आले?

या प्रकरणात मृत मुलींच्या आईने आणि मामाने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पीडित मुलींची आधी दुसरीकडे सोयरीक झाली होती, जी अचानक मोडून दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरवण्यात आले होते, असा दावा करण्यात आला आहे. मुली या निर्णयामुळे मानसिक दबावाखाली होत्या का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच मुलींची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी रात्रभर तांत्रिकांकडे फिरवण्यात आले, असा थरकाप उडवणारा आरोप आईने केला आहे.

हे ही वाचा : 'हसू झालंय माझं..,जीव होता तो माझा..', सोलापुरातल्या पायलची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट; तिघांना अटक

मृतदेह ठेवला शवागरात

या प्रकरणाचा तपास करताना नातेवाईकांनी आणखी एक खळबळजनक संशय व्यक्त केला आहे. मुलींच्या सोशल मीडिया अकाऊंटमधील डेटा डिलीट करण्यात आल्याचा दावा करत, वडील, काका आणि भावाच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयाच्या शवागारात ठेवले असून, ही आत्महत्या आहे की यामागे एखादा मोठा कट आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
 

    follow whatsapp