मुलाला पाठवले आईचे अश्लील Video, नंतर महिलेच्या मैत्रिणींनाही दाखवलं; अन्...

मुंबई तक

24 Jun 2025 (अपडेटेड: 24 Jun 2025, 06:06 PM)

Crime News: बिहारमध्ये एका महिलेचे अश्लील व्हिडिओ बनवून तिच्याच मुलाला पाठविण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाहीतर त्यानं संबंधित व्हिडिओ इतर महिलांनाही दाखवले आहेत. महिलेनं विरोध केला असता, आरोपीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. 

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुणाने महिलेचे बनवले अश्लील व्हिडिओ

point

महिलेच्या पतीचं निधन झाल्यानं व्यक्तीने सोबत राहण्याची मागणी केली

Crime News : बिहारमध्ये एका महिलेचे अश्लील व्हिडिओ बनवून तिच्याच मुलाला पाठविण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाहीतर त्यानं संबंधित व्हिडिओ इतर महिलांनाही दाखवले आहेत. महिलेनं विरोध केला असता, आरोपीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : रुग्णालयात तरुणीवर सुरू होते उपचार, शौचालयासाठी उठली अन् रुग्णाने तिला खोलीत नेलं...

नेमकं काय घडलं? 

या घटनेत महिलांना मारहाण करण्यात आली. यामध्ये दोन महिलांसह इतर तिघेजण गंभीर जखमी झालेत. उपचारासाठी तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमी झालेल्या एका महिलेच्या पतीचं याआधीच निधन झालं होतं. त्यामुळे महिला आपल्या पत्नीसोबत रोजगारासाठी दुसऱ्या गावी जात होती, यावेळी भोला रविदासने जबरदस्ती करत प्रेमसंबंध ठेवण्यास सांगितले.

या घटनेबाबत बोलताना पीडित महिलेने सांगितलं की, 'भोला इथपर्यंतच न थांबता त्याने माझ्या भांगेत कुंकू भरलं आणि सोबत राहण्याची जबरदस्ती केली. मी प्रतिकार करत विरोध केला. पण त्याने अश्लील व्हिडिओ बनवले आणि माझ्या मुलाला पाठवले.' दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी भोला रविदासविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

महिलेचे अश्लील व्हिडिओ दाखवले

भोला हा सोमवारी त्याच्या कुटुंबीयांसह घरी आला. त्याने परिसरातील महिलांना अश्लील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली. भोलाने केलेल्या कृत्याचा महिलेनं विरोध केला. तेव्हा त्याने त्यांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत.

हेही वाचा : दारूसाठी पैसे देण्यास पत्नीचा नकार, नवऱ्याची सटकली अन् लहान लेकरांसमोर गळा दाबत...थरकाप उडवणारी घटना

दरम्यान, महिलांना आता नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत तक्रार दाखल झाल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितलं जात आहे.