Nalasopara Crime: क्रूर! लिव्ह इन पार्टनरची हत्या, बेडमध्ये लपवला मृतदेह

मुंबई तक

15 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 07:14 PM)

Man killed Live in Partner in nalasopara : श्रद्धा वालकर, निक्की यादव हे लिव्ह इन हत्या प्रकरणं देशात चर्चेत असतानाच अशीच भयंकर घटना मुंबईलगतच्या नालासोपारा (Nalasopara) भागात घडलीये. एका 35 वर्षीय आरोपीने त्याच्या 37 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. हत्या उघड होऊ नये म्हणून आरोपीने लिव्ह इन पार्टनरचा मृतदेह बेडमध्ये लपवला होता. पोलिसांनी राजस्थान […]

Mumbaitak
follow google news

Man killed Live in Partner in nalasopara : श्रद्धा वालकर, निक्की यादव हे लिव्ह इन हत्या प्रकरणं देशात चर्चेत असतानाच अशीच भयंकर घटना मुंबईलगतच्या नालासोपारा (Nalasopara) भागात घडलीये. एका 35 वर्षीय आरोपीने त्याच्या 37 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. हत्या उघड होऊ नये म्हणून आरोपीने लिव्ह इन पार्टनरचा मृतदेह बेडमध्ये लपवला होता. पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे.

हे वाचलं का?

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर आणि निक्की यादव या दोघींच्या हत्येच्या प्रकरणात देशात खळबळ माजली. या हत्या प्रकरणांची चर्चा सुरू असतानाच नालासोपारात याचीच पुनरावृत्ती झालीये. नालासोपारा पूर्वमध्ये लिव्ह इन पार्टनरची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तुळींज पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार समोर आला आणि नालासोपाऱ्यात खळबळ उडाली.

नालासोपारा पूर्वमधील सीता सदन सोसायटीत 35 वर्षीय हार्दिक शाह (Hardik Shah) हा 37 वर्षीया मेघा धनसिंग तोरवी (Megha Torvi) हिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही महिन्यांपूर्वीच दोघे इमारतीतील फ्लॅटमध्ये राहायला आले होते. फ्लॅट भाड्याने घेताना त्यांनी रिअल इस्टेट एजंट, घरमालक आणि शेजाऱ्यांना ते पती-पत्नी असल्याचे सांगितले होते.

हार्दिक शाहने लिव्ह इन पार्टनरची हत्या का केली?

हार्दिक शाह काहीही काम करायचा नाही, तर मेघा तोरवी नर्स म्हणून काम करायची. तिच्या पगारावर दोघेही राहायचे. हार्दिक काम करत नसल्यानं दोघांमध्ये वाद सुरु झाले. सततच्या वादाचा राग येऊन हार्दिक शाहने मेघाची हत्याच केली. हार्दिकने गळा आवळून मेघाला संपवलं.

लिव्ह इन पार्टनर मेघा पूर्वीची हत्या केल्यानंतर हार्दिक शाहने घरातील सर्व सामान विकून टाकलं. हत्या केल्याचं कुणाला कळू नये म्हणून त्याने मेघाचा मृतदेह बेडमध्ये लपवला.

सातारा: सातवीतील विद्यार्थिनी 4 महिन्यांची गर्भवती, नववीतील विद्यार्थ्यानेच…

मेघाची हत्या केल्याचं सांगितलं अन् ट्रेन पकडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिकने मेघाची हत्या केल्यानंतर तिच्या कर्नाटकातील मावशीला मेसेज केला. हार्दिकने मेसेज करून सांगितलं की, मी मेघाची हत्या केली आहे. तिचा मृतदेह बेडच्या मध्ये ठेवला आहे आणि आता मी आत्महत्या करायला जात आहे.

त्यानंतर मेघाच्या मावशीने फ्लॅट शोधून देणाऱ्या रिअल इस्टेट एजंटला कॉल केला आणि त्यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितलं. एजंट घरी गेला. त्याने बेल वाजवली, मात्र आतून प्रतिसाद आला नाही. मात्र, त्याला आतून वास आला.

Nikki Yadav: गोव्याचा प्लान, निक्कीसोबत कारमध्ये… स्टोरी ऐकून पोलिसही हादरले

एजंटने तुळींज पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी येऊन घराचा दरवाजा तोडला. आत पाहणी केली असता बेडच्या मध्ये मेघाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला. मेघाचा श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे.

Shraddha Murder Case : “श्रद्धाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं शीर दररोज पाहायचो” ऐकून पोलिसही हादरले

दरम्यान पोलिसांनी हार्दिक शाहविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हार्दिकचं राजस्थानातील गाव शोधलं. त्यानंतर राजस्थान पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, मुंबई पोलिसांनी त्याला राजस्थान पोलिसांकडून ताब्यात घेतलं आहे.

    follow whatsapp