अल्पवयीन विद्यार्थ्याला पळवून नेणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा म्हणाली माझ्या पोटात त्याचंच...

शिक्षक आणि विद्यार्थ्याचं गुरू शिष्याचं नातं असतं. याच गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षिकेनं आपल्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विद्यार्थ्याचंच असल्याचा दावा तिनं केला आहे.

अल्पवयीन विद्यार्थ्याला पळवून नेणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा म्हणाली माझ्या पोटात त्याचंच...

अल्पवयीन विद्यार्थ्याला पळवून नेणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा म्हणाली माझ्या पोटात त्याचंच...

मुंबई तक

04 May 2025 (अपडेटेड: 04 May 2025, 07:11 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं गुरू शिष्याचं असतं.

point

याच नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली

point

शिक्षिकेच्या पोटात तिच्या विद्यार्थ्य़ांचं बाळ वाढत असल्याचा दावा तिनं केला आहे.

Surat Child Kidnap Case : शिक्षक आणि विद्यार्थ्याचं गुरू शिष्याचं नातं असतं. पण या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आलीय. शिक्षिका विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची घटना ताजी असतानाच नवा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोटात वाढणारं बाळ हे विद्यार्थ्याचंच असल्याचा दावा त्या शिक्षिकेनं केला आहे. 

हे वाचलं का?

काय होतं प्रकरण? 

विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या नात्याला काळिमा फासणारी घटना गुजरातच्या सुरतमध्ये घडली. 23 वर्षीय शिक्षिका 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर महिला शिक्षिकेनं धक्कादायक माहिती दिली. मागील पाच महिन्यांपासून गर्भवती असल्याने विद्यार्थ्यासोबत पळून गेली. 

हेही वाचा : जन्मदात्या बापानं मुलाला संपवलं, आठ दिवसाआधी त्याच मुलानं केला होता स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
 
शिक्षिकेनं म्हटलं, दोन वर्षांपासून विद्यार्थ्यासोबत माझे प्रेमसंबंध आहेत. मी गर्भवती असून माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप पळून गेलेला विद्यार्थीच आहे, असं शिक्षिकेनं म्हटलंय. दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थ्याचं अपहरण करण्याच्या आरोपाखाली कलम 137(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसंच पोक्सोच्या कलम 4,8,12 अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. अशातच पोलिसांनी राजस्थानच्या सीमेजवळ असलेल्या एका बसमध्ये दोघांना पकडलं. 

हेही वाचा : कौटुंबिक कलहातून पत्नीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्रांनी जावयालाच संपवलं अन्...

पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता, शिक्षिका विद्यार्थ्याला बडोद्याला एका हॉटेमध्ये घेऊन गेली होती. तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मिळाले आहेत. इतरही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सुरत पोलिसांनी दिली. संबंधित प्रकरणात पोलीस अधिकचा तपास करत आहेत. पुढील पोलीस तपासात नेमकं काय होणार याकडे अनेकांचं लक्ष्य लागलेलं आहे. 


    follow whatsapp