कौटुंबिक कलहातून पत्नीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्रांनी जावयालाच संपवलं अन्...
Jalgaon Crime News : जळगाव शहरात कौटुंबिक कलहातून पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनं जळगाव शहरात एकच खळबळ माजली आहे. आकाश पंडीत असे मृत तरुणाचे नाव आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कौटुंबिक कलहातून पत्नीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्रांनी जावयालाच संपवलं
हत्येनंतर आरोपी फरार झाले आहेत.
आकाश पंडीत असे मृत तरुणाचे नाव असल्याचे तपासातून समोर आलं आहे.
Jalgaon Crime News : जळगाव शहरात कौटुंबिक कलहातून पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनं जळगाव शहरात एकच खळबळ माजली आहे. आकाश पंडीत असे मृत तरुणाचे नाव असल्याचे तपासातून समोर आलं आहे. या हत्येनंतर आरोपी फरार झाले आहेत. संबंधित प्रकरणात पोलिसांनी लक्ष्य घालत तपासाला सुरूवात केली आहे.
तर जळगावनंतर अकोल्यातही अशीच घटना घडली आहे. पतीने त्याच्या पत्नीसोबत तीन मुलांची हत्या केली आहे. ही घटना शनिवारी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगावनंतरचं अकोल्यातलं दुहेरी हत्याकांड असल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा : मुलाने वडिलांचा जीव घेतला, ओढणीने गळा आवळला अन्... हत्येचं नेमकं कारण काय?
काय होतं एकूण प्रकरण?
जळगाव शहरामध्ये कालंका माता मंदिराच्या परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमार ही घटना घडली आहे. पतीवर पत्नीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्राने हत्या केली आहे. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती समजताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला.
त्यानंतर तो मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणात चार संशयितांची नावे समोर आली आहेत. यामुळे जळगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.










