मुलाने वडिलांचा जीव घेतला, ओढणीने गळा आवळला अन्... हत्येचं नेमकं कारण काय?
बाप आणि लेकाच्या नात्याला काळिमा!, ओढणीच्या सहाय्याने लेकाने वडिलांच्या नरडीचा घेतला घोट , गडचिरोली जिल्ह्यात घडला धक्कादायक प्रकार, आकाश रेवनाथ काडपे (वय 29) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गडचिरोलीमध्ये लेकाने वडिलांची केली हत्या

बाप आणि लेकाच्या नात्याला काळिमा

आकाश रेवनाथ काडपे अशी मुलाची ओळख
Gadchiroli Crime News: गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लेकाने ओढणीच्या सहाय्याने आपल्या वडिलांचा गळा आवळून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कृत्यानंतर मुलाने नदीत उडी घेतली. मात्र, तो बचावला गेला. काही वेळानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित प्रकरणाची चौकशी केली. या तपासातून मुलानेच वडिलांची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात आकाश रेवनाथ काडपे (वय 29 वर्ष) असे आरोपी मुलाचे नाव आहे. तर हत्येत मदत करणाऱ्या मित्राचे नाव हे लखन मडावी आहे. तर हत्या करण्यात आलेल्या वडिलांचे नाव हे रेवनाथ काडपे आहे. संबंधित हत्या प्रकरणी आता पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
मित्राच्या मदतीनं वडिलांची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या प्रकरणातील सर्व पुरावे लपवण्यासाठी पोटच्या मुलानं मित्राच्या मदतीनं वडिलांचा मृतदेह आधी जंगलात फेकून दिला. त्यानंतर स्वत:च वडील बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, त्यानंतर 15 दिवसांनंतर पोलिसांनी संबंधित प्रकरण जाणून घेतले आणि तपासाला सुरूवात केली. पोलिसांचा तपास सुरू झाल्याने आकाश काडपे याला धास्ती वाटू लागली आणि त्याने थेट नदीत उडी घेतली. मात्र, यावेळी तो बचावला गेला. पोलिसांनी विस्तृत तपास केल्यानंतर आकाशनेच स्वत:च्या वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. यावेळी मुलासोबतच त्याच्या मित्राच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
हत्येचं कारण आलं समोर
दरम्यान, हत्या करण्यात आलेले रेवनाथ हे मार्कंडमधील देवस्थानातील निवासात मजुरदार म्हणून कार्यरत होते. तर आरोपी मुलगा आकाश हा त्याच ठिकाणी मजुरीचे काम करत असत. वडील आणि मुलांमध्ये अनेकदा वाद झाले होते. वडील सतत शिवीगाळ करतात याचा आकाशच्या मनात राग होता. अशातच आकाशने आपल्या वडिलांकडे पैशीची मागणी केली असता पुन्हा वादाला तोंड फुटले.
15 एप्रिल रोजी वाद मोठ्या प्रमाणात विकोपाला गेला. या वादानंतर आकाशने ओढणीच्या सहाय्याने आपल्या वडिलांचा गळा आवळला आणि त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने आपल्या लखन नावाच्या मित्राला एक चारचाकी गाडी घेऊन बोलावले. त्यानंतर दोघांनी मृतदेह गाडीत टाकला आणि त्यानंतर तो मृतदेह जंगलात टाकून दिला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास केल्याने ही संपूर्ण घटना आता उघडकीस आली आहे.