आशीषशी लग्न अन् संजयसोबत अफेअर, अंजलीच निघाली पतीच्या हत्येची मास्टरमाईंड

Crime News : पोलीस अधीक्षक डॉ. अमृता दुहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएल पथकाच्या तपासासह तांत्रिक पुरावे गोळा केल्यानंतर संशय अधिक बळावला. कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता स्पष्ट झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले.

Crime News Crime News

Crime News Crime News

मुंबई तक

• 08:11 AM • 11 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आशीषशी लग्न अन् संजयसोबत अफेअर

point

अंजलीच निघाली पतीच्या हत्येची मास्टरमाईंड

Crime News : राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील एका कथित रस्ता अपघातामागे थरारक हत्या कट असल्याचं उघडकीस आलं असून, या प्रकरणाची मास्टरमाईंड मृतकाची पत्नीचं असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंदवलेला हा प्रकार तीन दिवसांच्या तपासानंतर सुनियोजित खुनात रूपांतरित झाला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

रावला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 31 जानेवारी 2026 रोजी हा प्रकार घडला. वजीरचंद नावाच्या व्यक्तीने आपल्या पुतण्या आशीष याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवत प्राथमिक तपास सुरू केला. मृतदेहावर झालेल्या जखमा अपघातात होणाऱ्या जखमांशी सुसंगत नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

पोलीस अधीक्षक डॉ. अमृता दुहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएल पथकाच्या तपासासह तांत्रिक पुरावे गोळा केल्यानंतर संशय अधिक बळावला. कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता स्पष्ट झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले.

हेही वाचा : "जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे जव्हारच्या 200 बेड रुग्णालयाचा निधी HUDCO कडे परत जाण्याची नामुष्की!"

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आशीषचे लग्न अवघ्या तीन महिन्यांपूर्वी अर्जु ऊर्फ अंजली हिच्याशी झाले होते. मात्र, अंजली या विवाहामुळे समाधानी नव्हती. तिचे संजय ऊर्फ संजू नावाच्या युवकासोबत कथित प्रेमसंबंध होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. या दोघांनी मिळून आशीषचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

घटनेच्या रात्री अंजलीने आशीषला फिरायला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले. निर्जन रस्त्यावर आधीच संजय आणि त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. संकेत मिळताच त्यांनी आशीषवर हल्ला केला. त्याला काठ्यांनी मारहाण करण्यात आली. तो बेशुद्ध पडल्यानंतर मफलरने गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप आहे. नंतर हा प्रकार रस्ता अपघात आणि लूट असल्याचे भासवण्यासाठी मृतदेहाजवळ त्याचा मोबाईल आणि अंजलीचे झुमके टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

या प्रकरणात पोलिसांनी संजय, रोहित ऊर्फ रॉकी, बादल ऊर्फ सिद्धार्थ आणि पत्नी अर्जु ऊर्फ अंजली यांना अटक केली आहे. चौकशीत सर्व आरोपींनी कट रचल्याची माहिती दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेमुळे काही काळापूर्वी गाजलेल्या सोनम रघुवंशी प्रकरणाची आठवण अनेकांना झाली आहे. त्या प्रकरणातही नवविवाहितेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केल्याचे समोर आले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

"जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे जव्हारच्या 200 बेड रुग्णालयाचा निधी HUDCO कडे परत जाण्याची नामुष्की!"

    follow whatsapp