खाकी वर्दीला बट्टा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीशी मैत्री, नंतर पोलीस कॉन्स्टेबलकडून नको तेच..

crime news : पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी कॉन्स्टेबल पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपीने विद्यार्थिनीशी मैत्री करून, तिला लग्नाचे आणि नोकरीचे आमिष देऊन तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या घटनेनं खाकी खाकी वर्दीला बट्टा लागल्याचे सांगण्यात येतेय.

crime news

crime news

मुंबई तक

• 09:00 AM • 18 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबल अटकेत

point

नोकरी आणि लग्नाचे तरुणीला दाखवले आमिष  

Crime News : पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी कॉन्स्टेबल पोलीस अधिकाऱ्याला अटक केली. आरोपीने विद्यार्थिनीशी मैत्री करून, तिला लग्नाचे आणि नोकरीचे आमिष देऊन तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अमरावतीत अश्लील व्हिडिओ कांड, 180 तरुणी आणि 350 'तसले' व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप, वातावरण तापलं

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबल अटकेत

मंगळवारी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबलला अटक केली, नंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी हा अलीगढ येथील खैर भागातील रहिवासी आहे. तो एका प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत होता. पोलिसांनी पीडितेचं मेडिकल चेकअप केलं असता, तिचा न्यायालयीन जबाब नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

नोकरी आणि लग्नाचे तरुणीला दाखवले आमिष  

दरम्यान, पीडित तरुणी ही काकादेवी परिसरात मुलींच्या वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. 19 जानेवारी 2026 रोजी, ती परीक्षा देण्यासाठी कानपूर सेंट्रल स्टेशनवरून आग्रा येथे रेल्वेने प्रवास करत होती. रेल्वेमध्ये तिची भेट अलीगढच्या घैर भागातील योगेंद्र सिंग नावाच्या प्रशिक्षणार्थी हवालदाराशी झाली होती. त्यांच्यातील संवाद वाढू लागला, त्यांनी एकमेकांचे फोन नंबर शेअर केले, त्याचदरम्यान त्याने तिला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. 

तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल अनेकदा लैंगिक शोषण

22 फेब्रुवारी रोजी त्याने तिला रिझर्व्ह पोलीस लाइन्समधील शहीद स्मारकाच्या मागे बोलावले, जिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक शोषण करण्यात आले. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेकदा लैंगिक शोषण करण सुरुच ठेवलं. दरम्यान, 8 एप्रिल रोजी त्याने तिला शेवटचे बोलावले तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले, नंतर तिला नोकरी मिळवून देण्यास आणि लग्नास नकार दिला. 

हे ही वाचा : प्रेमसंबंधातून नवऱ्याचे तुकडे, डिझेलनं जाळला मृतदेह अन् जेसीबीने शेतात पुरला, बायकोच्या प्रेमाचा रक्तरंजित थरार

तपासाचे प्रभारी डिसीपी लाइन्स शिवा सिंह यांनी पीडिता आणि आरोपी कॉन्स्टेबल या  दोघांचे नाव नोंदवून घेतले. प्राथमिक तपासात कॉन्स्टेबल दोषी असल्याचं आढळून आलं. पीडितेच्या तक्रारीनंतर, रात्री उशिरा पोलीस ठाणे गाठून धमकी आणि खोटे आश्वासन दिल्याच्या आरोपाखाली लैंगिक शोषण करण्यात आलं. संबंधित प्रकरणात आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.