Crime News : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचा मृतदेह लाल रंगाच्या सुटकेसमध्ये सापडल्याने पोलीस तपासादरम्यान कोड्यात सापडले आहेत. महिलेची हत्या करण्यात आली की तिने आत्महत्या केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस अनेक बाजूने या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच पोलीस पोस्ट मॉर्टमच्या रिपोर्टवर लक्ष्य ठेवून आहेत. कारण त्यातून मृत्यूचं कारण समोर येईल. दरम्यान मृत पत्नीचं वय वर्षे 32 असल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा : शिवराज दिवटे मारहाणप्रकरणात 'बीड बंद'ची हाक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
ADVERTISEMENT
या घटनेत महिलेचा मृतदेह हा एका सुटकेसमध्ये आढळला. महिलेचा मृतदेह हा तिच्या पतीने लाल रंगाच्या सुटकेसमध्ये ठेवला होता. या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांना सुटकेस सापडली. दुसरीकडे, पती म्हणतो की, त्याच्या पत्नीने स्वत: आत्महत्या केली होती. शाहजहांपूर येथे घडलेला हा प्रकार विचित्र आहे.
शाहजहांपूरच्या तिल्हार पोलीस ठाणे परिसरात पक्का कटरा येथे अशोक कुमार त्याची पत्नी सविता आणि 3 मुले असं त्यांचं कुटुंब राहत होतं. सविताचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सविताचा मृतदेह लाल रंगाच्या सुटकेसमध्ये आढळल्याचं दिसून आलं. या तपासात पोलिसांनी अशोकवर संशय व्यक्त करत त्याला ताब्यात घेतले.
सुटकेसमध्ये पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न अशोकने केला होता. पण त्यापूर्वीच पोलीस तिथे पोहोचले होते. पण पोलिसांनी अशोककडे चौकशी केली असता, अशोकने वेगळाच घटनाक्रम सांगण्यास सुरुवात केली. यामुळे पोलिसांचा अशोकवर अधिक संशय बळावला गेला.
हेही वाचा : ज्योती मल्होत्राची मैत्रीण पण करायची PAK साठी काम..? कोण आहे Youtuber प्रियंका सेनापती?
नेमकं काय म्हणाला अशोक?
या प्रकरणात अशोक म्हणाला की, त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पत्नीच्या मृत्यूनंतर तो भयंकर घाबरला होता. त्या मृतदेहाला एका सुटकेसमध्ये टाकण्यात आलं होतं. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने या प्रकरणाची माहिती घेतली. अशावेळी अशोकला ताब्यात घेण्यात आलं. तर पोलिसांचे पोस्ट मॉर्टमच्या रिपोर्टकडे लक्ष्य आहे. पोस्ट मॉर्टमच्या रिपोर्टमधून हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला आहे की ही हत्या आहे. ही खरी कोटी लवकरच समोर येईल.
ADVERTISEMENT
