मुलींच्या वसतिगृहात सुरू होता घाणेरडा खेळ, परराज्यातून महिलांचं सुरू होतं सेक्स रॅकेट, एका झटक्यातच...

Crime News : मुलीच्या वसतिगृहातून घाणेरडं कांड समोर आलं आहे. मुलीच्या सुरक्षेसाठी वसतिगृह असतं पण त्याच ठिकाणी देह व्यापार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 02:27 PM • 08 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीच्या वसतिगृहातून घाणेरडं कांड समोर

point

पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

point

नेमकं काय घडलं?

Crime News : मुलीच्या वसतिगृहातून घाणेरडं कांड समोर आलं आहे. वसतिगृहाचा वापर हा राहण्याठी केला जातो. पण त्याच वसतिगृहात देह व्यापाराचा घाणेरडा खेळ सुरू असल्याचं दिसून आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील रांची येथील आहे. रांचीच्या उपअधीक्षकांनी या घडलेल्या घटनेवर भाष्य केले की, या प्रकरणात सहभागी असलेल्याला आरोपाखाली 19 महिलांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी एका वसतीगृहात व्यवस्थापकाला अटकही करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 17 सप्टेंबरपासून बुधादित्य योग निर्माण होणार, काही राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ होईल

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाव 

रांचीचे डेप्युटी एसपी सिटी केव्ही रमण यांनी या प्रकरणाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. ते म्हणाले की, एका पोलीस अधिकाऱ्याला माहिती मिळाली होती की, की काही लोक परराज्यातून मुली आणतात आणि सेक्स रॅकेट चालू करतात. या मुलींना वेश्या म्हणून काम करायला लावले जाते. या माहितीनंतर पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गर्ल्स हॉस्टेलवर धाव घेत छापा टाकला.

पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन छापा टाकत तब्बल 10 मुलींना ताब्यात घेतलं. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. या कामात सहभागी असलेल्या गुन्हेगारांची ओळख पटली आहे. देह व्यापार रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यात सामील असलेल्या मुली पश्चिम बंगालच्या असल्याचं सांगण्यात येत आहे.

वसतिगृहाच्या मालकावरही कायदेशीर कारवाई

संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, या मुली एका वसतिगृहात राहतात. याच ठिकाणी असं कृत्य घडल्याने संबंधित वसतिगृह व्यवस्थापकालाही ताब्यात घेण्यात आलंय. वसतिगृहाच्या मालकावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या आरोपींची पुढील चौकशी सुरु आहे.

हे ही वाचा : फ्लाइटमध्ये शेजारी बसली सुंदर महिला जुळलं सूत, पण फ्लाइट लँड झालं आणि 'त्या' गोष्टीमुळे...

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलींना पैसे देण्याच्या पद्धतीची चौकशी केली जात आहे. यामध्ये सक्रियपणे सहभागी असलेल्या इतर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी एखाद्या नेटवर्कप्रमाणेच काम करते, याचा पोलीस पुढील तपास करू लागले आहेत.

    follow whatsapp