महिलेनं नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या, पेट्रोल ओतून जाळलं अन्..

मुंबई तक

• 01:27 PM • 29 Jun 2026

Crime News : पत्नीने अनैतिक प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, पतीला तिने झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर बेशुद्ध केलं आणि नंतर अंगावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. गंभीररित्या भाजलेल्या नवऱ्याचा सात दिवसानंतर दुर्दैवी मृत्यू झाला.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

निशाचे शेजारी राहणाऱ्या विक्रांत नामक तरुणासोबत अनैतिक संबंध

point

दोघांनी झोपलेल्या नवऱ्यावर पेट्रोल ओतून जाळलं 

Crime News : पत्नीने अनैतिक प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, पतीला तिने झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर बेशुद्ध केलं आणि अंगावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. गंभीररित्या भाजलेल्या नवऱ्याचा सात दिवसानंतर दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करत कारवाई केली. ही घटना उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात घडली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शनीची वक्री गती आणि गुरूचा अस्त एकत्र, 'या' राशी अडचणीत येतील

निशाचे शेजारी राहणाऱ्या विक्रांत नामक तरुणासोबत अनैतिक संबंध

हे प्रकरण बागपतच्या बिनाउली पोलीस ठाणे परिसरातील बिजवाडा गावातील आहे. राजीव तिथे त्याची पत्नी निशा, उर्फ निशूसोबत राहत होता. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, निशाचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विक्रांत नामक तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू होते. घडलेल्या घटनेनुसार, राजीव संबंधांना सातत्याने विरोध करत होता, दोघांमध्ये वाद वाढत होता. यातूनच पतीला संपवण्याचा पत्नीने कट रचला होता. 

दोघांनी झोपलेल्या नवऱ्यावर पेट्रोल ओतून जाळलं 

मिळालेल्या माहितीनुसार, 20 जून रोजी रात्री निशाने तिचा नवरा राजीवला झोपेच्या गोळ्या दिल्या. तो गाढ झोपलेल्या अवस्थेत होता तिने तिचा प्रियकर विक्रांतला घरी बोलावले. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, दोघांनी झोपलेल्या राजीववर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं. आगीत राजीव होरपळून निघाला, अशातच त्याच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. 

हे ही वाचा : नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

परिस्थिती पाहून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर गंभीर अवस्थेत एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र नंतर तो सलग सात दिवस मृत्यूशी झुंज देत होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत निशा आणि प्रियकर विक्रांतला अटक केली.