नऊ वर्षांच्या मुलीवर भावासमोर लैंगिक अत्याचार, अखेर कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार

मुंबई तक

• 07:00 AM • 21 Aug 2026

Crime News : एका नऊ वर्षांच्या मुलीवर भावासमोर नराधमाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. 24 वर्षीय आरोपीच्या मदतीने पीडित मुलगी आणि 11 वर्षांच्या भावाला दुचाकीवरून बसवून निर्जनस्थळी नेलं. दरम्यान भावाने विरोध केला असता, बेदम मारहाण करण्यात आली.

Crime news

Crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चिमुरडीवर भावासमोर आरोपीकडून अत्याचार 

point

भावाने कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार 

Crime News : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. एका नऊ वर्षांच्या मुलीवर भावासमोर नराधमाने  लैंगिक अत्याचार केला. 24 वर्षीय आरोपीच्या मदतीने पीडित मुलगी आणि 11 वर्षांच्या भावाला दुचाकीवरून बसवून निर्जनस्थळी नेलं. दरम्यान भावाने विरोध केला असता, बेदम मारहाण करण्यात आली. आरोपीने मुलीला बेशुद्ध स्थितीत सोडून दिले. या प्रकरणी विविध कलमांन्वये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शेतातील झोपडीत सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार, थोरल्या बहिणीने नको तेच पाहिलं अन्..

चिमुरडीवर भावासमोर आरोपीकडून अत्याचार 

ही घटना मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्याच्या मेहगाव पोलीस ठाणे परिसरातील आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने 24 वर्षीय आरोपीची वाल्मीकी अशी ओळख सांगितली. आरोपी वाल्मीकीनं पीडितेला गावाबाहेरील शेतात नेलं, मात्र तिथे गुरे चारण्यासाठी आलेले लोक पाहून त्याने तिथून रास्ता बदलला. आरोपीने शाळेच्या मागे एका झाडीत नेत पीडितेवर भावासमोरच अत्याचार केला. याचदरम्यान भावाने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने भावाला मारहाण केली. 

भावाने कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार 

आरोपी दोघांनाही घटनास्थळावरून पळून गेला होता. आरोपीच्या क्रूरतेमुळे 9 वर्षांची चिमुरडी मरण यातना भोगत होती. भाऊ पूर्णपणे भयभीत झाला होता. त्याने कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. अशातच कुटुंबीय तत्काळपणे घटनास्थळी पोहोचले, मुलीला रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून पीडितेला रुग्णालयात घेऊन गेले. 

हे ही वाचा : आईनं पोटच्या लेकीवर प्रियकराला अत्याचार करण्यास भाग पाडले अन्..

दरम्यान, कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे महगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांसह गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केलाय. वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीला अटक केली आहे.