शेतातील झोपडीत सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार, थोरल्या बहिणीने नको तेच पाहिलं अन्..

मुंबई तक

Crime News : शेतातील झोपडीत सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीवर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात परीक्षणासाठी पाठवण्यात आले. 

ADVERTISEMENT

crime news (AI)
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

चिमुरडीचं तोंड दाबून लैंगिक अत्याचार

point

थोरल्या बहिणीने नको तेच पाहिलं

Crime News : उत्तर प्रदेशातील संभल येथून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. एका शेतातील झोपडीत सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीवर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात परीक्षणासाठी पाठवण्यात आले. 

हे ही वाचा : आईनं पोटच्या लेकीवर प्रियकराला अत्याचार करण्यास भाग पाडले अन्..

चिमुरडीचं तोंड दाबून लैंगिक अत्याचार

कुटुंबीयांनुसार, चिमुरडी मुलगी ही शुक्रवारी सकाळी शेतात खेळत होती. त्याचदरम्यान आरोपी किशोरने तिला एका शेतात बनवलेल्या झोपडीत नेले. संबंधित प्रकरणात आरोप केला की, चिमुरडीचं तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याचदरम्यान, पीडितेची बहीण अचानकपणे शेतातील झोपडीत शिरली, त्यानंतर आरोपी पीडितेसोबत गैरकृत्य करताना दिसला. 

थोरल्या बहिणीने नको तेच पाहिलं

बहिणीने आरडाओरड केली असता, ग्रामस्थ लोक एकत्र आले. इतक्यातच आरोपी किशोर घटनास्थळावरून तात्काळपणे फरार झाला. पीडितेचं घटनास्थळावरून 800 मीटर अंतरावर घर आहे. चिमुकलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, थोरल्या लेकीने धाकटया लेकीसोबत संबंधित नराधम गैरकृत्य करत असल्याचे पाहिले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. 

हे ही वाचा : इंस्टाग्रामवरील 'तो' फोटो, पुजाऱ्यानेच अंकित आणि इसरारला मारून मंदिर परिसरात पुरलं..

पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप चौधरी यांनी तक्रारीच्या आधारावर किशोर विरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. चिमुकलीला मेडिकल परीक्षणासाठी सरकारी रुग्णालयाच दाखल करण्यात आले होते. मेडिकल रिपोर्टनुसार, पुढील कारवाई केली जाईल. या प्रकरणात आरोपी किशोरचा पुढील तपास सुरू आहे.