इंस्टाग्रामवरील 'तो' फोटो, पुजाऱ्यानेच अंकित आणि इसरारला मारून मंदिर परिसरात पुरलं..

मुंबई तक

Crime News : इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेल्या एका फोटोवरून एका पुजाऱ्याने अंकित आणि इसरार नावाच्या तरुणाची हत्या केली. नंतर त्यांचे मृतदेह मंदिर परिसरात खोदण्यात आले होते.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मंदिर परिसरात मृतदेह खड्डा खणून गाडले

point

20 दिवसांनंतर हत्याकांडाचा खुलासा

Crime News : उत्तर प्रदेशातील बागपत येथे दोन मित्र अंकित आणि इसरारच्या हत्येची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास देखील केला असता, इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेल्या एका फोटोवरून प्रकरण उघडकीस आले. संबंधित फोटोत गणेश मंदिरातील पुजारी नरेशनाथ आणि मृत अंकितची बहीण एक-दुसऱ्यासोबत थांबलेले आढळून आले होते.  

हे ही वाचा : Astrology : आज 15 ऑगस्ट, जाणून घ्या एकूण राशीभविष्य

मंदिर परिसरात मृतदेह खड्डा खणून गाडले

संबंधित फोटो हा अंकितने पाहिला आणि तो नंतर आपला मित्र पुजारीला भेटण्यासाठी गेला होता. संबंधित प्रकरणात दोघेही परतले नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यांचे मृतदेह मंदिर परिसरात खड्डा खणून गाडण्यात आले होता. अंकिताची बहीण आणि पुजारी नरेशनाथदरम्यान जवळीकता वाढत गेली. तोच फोटो पुजाऱ्याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला. फोटो शेअर झाल्यानंतर पुजाऱ्याच्या त्या फोटोवर अंकितची नजर गेली होती. 

20 दिवसांनंतर हत्याकांडाचा खुलासा

याच फोटोला घेऊन अंकितच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अंकितच्या प्रेमसंबंधाच्या संशयातून इसरारला घेऊन मंदिर परिसरात गेला होता. सांगण्यात येतंय की, मंदिर परिसरात दोन्ही मित्रांची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी दोन्ही मृतदेह मंदिर परिसरात खड्डा खणून पुरले होते. यानंतर त्यावर टाईल्स लावण्यात आले. 20 दिवसांनंतर या हत्याकांडाचा खुलासा झाला. 

हे ही वाचा : बारामती : पतीला बाल्कनीत पुरण्याचा प्रयत्न; गवंड्यामुळे पत्नीचा धक्कादायक प्लॅन उघड

मृत व्यक्ती अंकित आणि इसरारची पत्नी तसेच बहिणीने इंस्टाग्रामवर ठेवलेल्या फोटोचा हवाला देत हत्येचा आरोप केला. पत्नीने आरोप केला की, अंकितच्या कुटुंबीयांनी नियोजितरित्या नवरा इसरारची देखील हत्या केली. कुटुंबीयांनी दावा केला की, अंकितच्या कुटुंबीयांना पहिल्यापासून पुजारी नरेशनाथ आणि अंकितच्या बहिणीदरम्यान, कथित प्रेमसंबंधाची माहिती मिळाली होती. इसरारचे कुटुंब अंकितच्या कुटुंबावर कारवाईची मागणी करत आहे.