बारामती : पतीला बाल्कनीत पुरण्याचा प्रयत्न; गवंड्यामुळे पत्नीचा धक्कादायक प्लॅन उघड

मुंबई तक

Baramati Crime News : बारामतीत पत्नीने पतीला जिवंतपणी बाल्कनीतील चौथऱ्यात पुरण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गवंड्याला संशय आल्याने प्रवीण जगताप यांचा जीव वाचला आणि प्रकरणाचा उलगडा झाला.

ADVERTISEMENT

Baramati Crime News
Baramati Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बारामती : पतीला बाल्कनीत पुरण्याचा प्रयत्न

point

गवंड्यामुळे पत्नीचा धक्कादायक प्लॅन उघड

Baramati Crime News : बारामतीतील इंद्रप्रस्थ सोसायटीत पतीला घराच्या बाल्कनीतच पुरण्याचा झालेला प्रयत्न गवंड्याच्या सतर्कतेमुळे उघड झाला आहे. प्रवीण जगताप हे पत्नी शर्मिला आणि आईसोबत राहत होते. या दाम्पत्याला दोन मुले असून, दोन्ही मुले काही महिन्यांपासून शर्मिलाच्या माहेरी राहत आहेत. शर्मिलाला झाडे लावण्याची आवड होती. घराच्या बाल्कनीत झाडे लावण्याची इच्छा तिने पतीकडे व्यक्त केली होती आणि प्रवीणनेही त्याला होकार दिला होता. त्यानंतर बाल्कनीत झाड लावण्यासाठी एक जागा तयार करण्यात आली. मात्र, याच जागेचा वापर प्रवीणला संपवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : आश्रमशाळेत सापाचा सतत वावर, मुख्याध्यापक बोलू देईना, मुंबई Tak ला थेट रोखण्याचा प्रयत्न

प्रवीण आणि त्याच्या आईला झोपेच्या गोळ्या दिल्या अन्... 

शर्मिलाने केलेल्या जेवणातून प्रवीण आणि त्याच्या आईला झोपेच्या गोळ्या दिल्याचे नंतर समोर आले. जेवण केल्यानंतर दोघेही गुंगीत गेले आणि बेशुद्ध झाले. त्यानंतर शर्मिलाने प्रवीणला बॅट आणि काठीने मारहाण केल्याचे प्रवीणने पोलिसांना सांगितले आहे. मारहाणीदरम्यान प्रवीण ओरडत होता, मात्र गुंगीमुळे त्याला स्वतःचा बचाव करता येत नव्हता. काही वेळाने त्याचा आवाज बंद झाल्याने शर्मिलाला त्याचा मृत्यू झाल्याचे वाटले. त्यानंतर तिने प्रवीणला बाल्कनीत झाड लावण्यासाठी तयार केलेल्या जागेत टाकले. त्यावर चादरी आणि उशा ठेवण्यात आल्या. ही जागा मोठ्या लादीने बंद करून त्यावर प्लास्टर करण्याचा तिचा प्लॅन असल्याचे समोर आले.

हेही वाचा : Maharashtra Weather: Depression सरकलं, पण पाऊस थांबणार नाही! पुढचे 48 तास कुठे मुसळधार पाऊस?