आश्रमशाळेत सापाचा सतत वावर, मुख्याध्यापक बोलू देईना, मुंबई Tak ला थेट रोखण्याचा प्रयत्न
Mumbai Tak Ground Report : मुरबाडच्या मोरोशीतील आदिवासी आश्रमशाळेत तुटलेल्या खिडक्यांच्या जाळ्या, अस्वच्छता आणि सापाच्या वावराचा विद्यार्थ्यांनी दावा केला आहे. पाहणीदरम्यान प्रभारी मुख्याध्यापकांनी ‘मुंबई तक’ला चित्रीकरण आणि बाईट घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आश्रमशाळेत सापाचा सतत वावर, मुख्याध्यापक बोलू देईना
मुंबई Tak ला थेट रोखण्याचा प्रयत्न
Mumbai Tak Ground Report : गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेत विषारी सर्पदंशामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर ‘मुंबई तक’च्या रिएलिटी चेकमध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधूनही गंभीर वास्तव समोर आलं आहे. मुरबाड तालुक्यातील मोरोशीच्या जंगल परिसरात असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत अस्वच्छतेचं चित्र दिसून आलं. विद्यार्थी ज्या खोल्यांमध्ये रात्री झोपतात, तिथल्या खिडक्यांच्या जाळ्या तुटलेल्या आहेत. मोठमोठे छिद्र पडलेल्या जाळ्यांवर कापड लावण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ शेवाळ आणि घाणीचं साम्राज्य दिसून आलं. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच परिसरात विषारी साप आढळल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
हेही वाचा : Personal Finance: एकाच पगारात घर, EMI, SIP आणि Emergency Fund कसं करायचं मॅनेज?
‘माईक घेऊ नका’, ‘चित्रीकरण करू नका’, मुख्याध्यापकांनी रोखलं
‘मुंबई तक’ने या आश्रमशाळेची पाहणी करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी रात्री झोपताना भीती वाटत असल्याचं सांगितलं. साप कोणता होता, असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘मण्यार’ साप असल्याचं सांगितलं. आश्रमशाळेच्या परिसरात तुटलेल्या खिडक्यांच्या जाळ्या, कापड लावलेल्या जागा आणि अस्वच्छता दिसून आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत ‘मुंबई तक’ने प्रभारी मुख्याध्यापक तानाजी पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी चित्रीकरण आणि बाईट घेण्यास आक्षेप घेतला. ‘माईक घेऊ नका’, ‘चित्रीकरण करू नका’, असं सांगत त्यांनी माध्यमांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : महाजन... मलई आणि बरंच काही! 'त्या' घोटाळ्याची कागदपत्रं मुंबई Tak वर
