Personal Finance: एकाच पगारात घर, EMI, SIP आणि Emergency Fund कसं करायचं मॅनेज?

रोहित गोळे

एकाच पगारावर Home Loan EMI, घरखर्च, SIP आणि Emergency Fund कसं मॅनेज करायचं? EMI किती असावी, Emergency Fund किती ठेवावा आणि SIP किती करावी, याचा मुद्देसूद Money Management Plan समजून घ्या.

ADVERTISEMENT

personal sinance single salary home loan emi sip emergency fund money management
Personal Finance (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: चॅटजीपीटी)
Google CTA

Personal Finance tips Salary Money Management: आजच्या काळात एकाच पगारावर घरखर्च, Home Loan EMI, SIP, Insurance आणि Emergency Fund सांभाळणं आव्हानात्मक आहे. मात्र योग्य आर्थिक नियोजन केल्यास हे नक्कीच शक्य आहे. त्यासाठी खालील 5 महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा.

1. EMI पगाराच्या 30-35% पेक्षा जास्त नको

Home Loan घेताना बँक किती कर्ज देते यापेक्षा तुम्ही आरामात किती EMI भरू शकता हे महत्त्वाचं आहे. साधारणपणे Take-home Salary च्या 30-35% पर्यंत EMI ठेवणं तुलनेने सुरक्षित मानलं जातं.

उदाहरणार्थ, 50000 हजार रुपये पगार असल्यास EMI साधारण 15,000 ते 17,500 रूपयांच्या आसपास ठेवण्याचा विचार करता येईल. इतर कर्जं असल्यास ही मर्यादा आणखी कमी ठेवणं योग्य ठरू शकतं.

2. Emergency Fund आधी मजबूत करा

नोकरी जाणं, अचानक वैद्यकीय खर्च किंवा कुटुंबातील इतर आर्थिक अडचणी आल्यास EMI मात्र सुरूच राहते. त्यामुळे किमान 3 ते 6 महिन्यांच्या आवश्यक खर्चाइतका Emergency Fund तयार करण्याचं लक्ष्य ठेवा.