MP Crime News : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका महिलेची तिच्याच सहकाऱ्याने चाकूने भोकसून हत्या केली. या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे. जबलपूरमधील महफिल बार अँड रेस्टॉरंटमध्ये 14 ऑगस्टच्या संध्याकाळी ही घटना घडली. मुस्कान चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. पवनने स्वयंपाकघरात ठेवलेल्या चाकूने मुस्कानवर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पवनला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Astrology : सिंह राशीतील सूर्य आणि केतूचा धोकादायक संयोग, 'या' राशींना सावध राहण्याचा इशारा
दोघांमध्ये काही कारणावरून वाद, नंतर पोटावर सपासप वार
पोलिसांच्या तपासादरम्यान रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याचे CCTV फुटेज मिळाले. जवळपास तीन मिनिटांच्या या फुटेजमध्ये संपूर्ण घटनाक्रम दिसत आहे. सुरुवातीच्या सुमारे एका मिनिटात मुस्कान आणि पवन स्वयंपाकघरात एकत्र काम करताना दिसतात. याचदरम्यान दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचे दिसते. त्यानंतर पवन अचानक संतापतो. तो स्वयंपाकघरात ठेवलेला चाकू उचलतो आणि मुस्कानजवळ जातो. त्यानंतर तिच्या पोटावर चाकूने वार करतो.
हेही वाचा : बायकोने दिलेला ज्यूस प्यायला अन् गेम झाला, प्रियकराच्या साथीने कविताने काटा काढला
मुस्कान जखमी तरीही पवन काहीही न झाल्यासारखा शांत
पवन एवढ्यावरच थांबत नाही. तो मुस्कानच्या पोटावर आणखी वार करतो. त्याने तिच्यावर चार वेळा चाकूने वार केल्याचे CCTV मध्ये दिसत आहे. हल्ल्यानंतर मुस्कान वेदनेने ओरडताना दिसते. तिच्या काही अंतरावर ती जखमी अवस्थेत पडलेली असतानाही पवनच्या वागण्यात कोणतीही घाई दिसत नाही. हल्ल्यानंतर सुमारे एका सेकंदाने आणखी एक कर्मचारी स्वयंपाकघरात येतो. मुस्कानला जखमी अवस्थेत पाहून तो घाबरतो आणि तेथून निघून जातो.
यानंतर पवनने पुन्हा स्वयंपाकाचे काम सुरू केले. तो सहजपणे एक पॅन उचलतो आणि काम करत राहतो. पुढील 40 ते 50 सेकंदांच्या फुटेजमध्ये पवन काम करताना दिसतो, तर मुस्कान त्याच्या काही अंतरावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसते. जवळपास एक मिनिटानंतर रेस्टॉरंटमधील इतर कर्मचारी तेथे पोहोचतात. ते मुस्कानला उचलून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातात. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी पवनला अटक केली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या हत्येमागील कारणाबाबतचा तपास पोलिसांकडून करण्यात आला.
ADVERTISEMENT












