मूल होत नसल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला संपवलं, हृदयविकाराचं कारण सांगत नातेवाईकांना...

crime news : पत्नीला बाळ होत नाही याचा मनात राग धरून पतीने आपल्या बायकोला संपवलं. हत्येचा संशय मिटवण्यासाठी पतीने आपल्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचा खोटा दावा केला. अखेर या हत्येचं पितळ उघडं पडलं. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

crime news

crime news

मुंबई तक

23 Jan 2026 (अपडेटेड: 23 Jan 2026, 02:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्यानं बायकोची हत्या करून हृदयविकाराच्या झटक्याचं कारण सांगितलं

point

मानेवरील खुणा पाहून त्यांचा संशय बळावला

Crime News : पत्नीला बाळ होत नाही याचा मनात राग धरून पतीने आपल्या बायकोला संपवलं. हत्येचा संशय मिटवण्यासाठी पतीने आपल्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचा खोटा दावा केला. अखेर या हत्येचं पितळ उघडं पडलं. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यात घडली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 10 वर्षाच्या मुलीला चहाचे आमिष दाखवून ई-रिक्षा चालकाकडून जंगलात अत्याचार, 'त्या' चप्पलवरून...

नवऱ्यानं बायकोची हत्या करून हृदयविकाराच्या झटक्याचं कारण सांगितलं

पीडितेचे नाव राजेश्वरी फकीरप्पा गिलक्कनवर असे होते. हत्येनंतर पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचं कारण सांगितलं. त्याने आपल्या सर्व नातेवाईकांना फोनच्या माध्यमातून सांगितलं की, हृदयविकाराचा झटक्याने पत्नीचा मृत्यू झाला.  ही घटना बेलागावी जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाल गावात घडली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.  

मानेवरील खुणा पाहून त्यांचा संशय बळावला

मृताचे पालक जेव्हा मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी आले असता मृतदेह पाहून त्यांना मृत्यूबाबत संशय आला होता. राजेश्वरीच्या मानेवरील खुणा पाहून त्यांचा संशय बळावला आहे, पालकांनी तातडीने बैलहोंगल पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली होती.  नंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असात, बायकोचा खून झाल्याचं समजलं. 

हे ही वाचा : फलटण हत्याकांड: पत्नीने पती आणि प्रियकरासोबत मिळून रचला कट अन् दुसऱ्या प्रियकराची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे नदी-तलावात...

पोलिसांनी तात्काळपणे हल्लेखोर फकीरप्पा गिलक्कनावर याला ताब्यात घेतलं. तसेच पत्नी राजेश्वरीचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी नेला असता, हे प्रकरण समोर आलं. चौकशीदरम्यान फकीरप्पाने हत्येचा कबुलीनामा दिला. पोलिसांनी फकीरप्पा यांना अटक केली. 

    follow whatsapp