Crime News : माणुसकीला काळिमा फासणारं धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. मामाने आपल्याच भाच्याच्या पत्नीला हाताशी धरून तरुणाची हत्या केली आहे. मामाचे आपल्याच भाचाच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. या दोघांच्या नातेसंबंधात भाचा सारखा मध्ये यायचा. अशातच मामाने भाच्याच्या पत्नीसोबत भाच्याला कसे संपवता यामागे मोठा कट रचत हत्या केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भावाने बहिणीला केलं विधवा, दाजीवर धारधार शस्त्राने केले सपासप वार, 'त्या' कारणावरून उजवा हात कोपऱ्यापासून छाटला
पत्नीने आणि मामाने तरुणाला पाजली दारू नंतर...
मामाने आपल्या भाच्याला मद्य पाजलं असता, त्याची दारू उतरल्यानंतर मामाने आणि भाच्याच्या पत्नीने मिळून पीडित तरुणाचा गळा दाबला, त्यानंतर तरुण बेशुद्ध पडला. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह उचलला आणि एका नाल्यात फेकून दिला आणि नंतर त्याची हत्या केली होती.
अशातच लखनऊच्या नगराम ठाणे परिसरातील क्षेत्रात एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मृतकाचे नाव रामफेर असे होते. तसेच मृत रामफेरच्या भावाने या हत्येप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. तपासादरम्यान, मृत व्यक्तिची पत्नी संबंधित प्रकरणात पोलिसांच्या जाळ्यात आलीच. यानंतर मृत तरुणाचे मामा वसंत लाल हे नाव समोर आले आहे. या एकूण घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसही चक्रावून गेले.
हे ही वाचा : पती-पत्नीत 'त्या' काराणावरून झाला वाद, पतीची सटकली अन् पत्नीवर हल्ला करत केला खून, नंतर व्हिडिओ कॉलद्वारे दिली गुन्ह्याची कबुली
हत्येचं कारण समोर
या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, मृतक रामफेरची हत्या करून मामा बसंत लाल आणि त्याची पत्नी मीरा हे एकमेकांशी विवाह करणार असल्याचं त्यांचं प्लॅनिंग होतं. तसेच मामा आणि तरुणाच्या पत्नीने हत्येचा कट रचला होता. संबंधित प्रकरणात पोलिसांनी मामा आणि त्याची प्रेयसी आणि इतर एका व्यक्तीला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
