पती-पत्नीत 'त्या' काराणावरून झाला वाद, पतीची सटकली अन् पत्नीवर हल्ला करत केला खून, नंतर व्हिडिओ कॉलद्वारे गुन्ह्याची दिली कबुली
crime news : एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. या हत्येनंतर, आरोपी पतीने फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, नंतर पोलिसांसमोर जाऊन स्वत: सरेंडर झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पतीने पत्नीची गळा दाबून केली हत्या

फेसबुक लाईव्हद्वारे गुन्ह्याची कबुली

गुन्ह्यामागचं कारण काय?
Crime News : एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा गळा दाबून हत्या केली आहे. या हत्येनंतर, आरोपी पतीने फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, नंतर पोलिसांसमोर जाऊन स्वत: सरेंडर झाला. ही दुर्देवी घटना केरळातील कोल्लम जिल्ह्यातील पुनालूर येथे घडली आहे. आरोपी पतीचं नाव ऐसेक (वय 42) असे आहे. तर मृत महिलेचं नाव शालिनी (वय 39) असे आहे. ही घटना सोमवारी 6 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
हे ही वाचा : भावाने बहिणीला केलं विधवा, दाजीवर धारधार शस्त्राने केले सपासप वार, 'त्या' कारणावरून उजवा हात कोपऱ्यापासून छाटला
पतीचा अडीच मिनिटांचा लाइव्ह व्हिडिओ कॉल अन्...
पती ऐसेकने आपली पत्नी शालिनीवर हल्ला केला, त्यानंतर ऐसेकने त्याच्या फेसबुक अकाउंटवर अडीच मिनिटांचा लाइव्ह व्हिडिओ कॉल केला, त्या व्हिडिओ कॉलमध्ये त्यांनी आपली पत्नी शालिनीची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्याने आपल्या पत्नीचे परपुरूषासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपही केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैवाहिक वादामुळे पती आणि पत्नी शालिनी हे दोघेही त्यांच्या वैयक्तिक कारणाने विभक्त राहत होते. जेव्हा पती हल्ला करून घटनास्थळावरून पळून गेला असता, त्यानंतर तो पोलिसांना शरण केल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : सोलापूरात खळबळ! मुलीचा वयाच्या दहाव्या वर्षी बालविवाह, नंतर 12 व्या वर्षी लहान बाळाला रुग्णवाहिकेत दिला जन्म, नेमकं काय घडलं?
पत्नीचे अज्ञात पुरुषांशी प्रेमसंबंध
व्हिडिओमध्ये पतीने आरोप केला की, शालिनीचे दुसऱ्या अज्ञात पुरुषाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे ती आपल्या मुला बाळांकडे दुर्लक्ष करत होती. त्याने असाही दावा केला की, बांधलेलं घर सोडण्यास तिने अनेकदा आरोप केला होता. दरम्यान, सध्या पती-पत्नी दरम्यान होणारे वाद विवाद हे सामान्य असतात. पण हेच वाद जेव्हा टोकाची भूमिका घेतात, त्यामुळे त्यांच्या संसाराचं नको तेच हाल होतात.