सोलापूरात खळबळ! मुलीचा वयाच्या दहाव्या वर्षी बालविवाह, नंतर 12 व्या वर्षी लहान बाळाला रुग्णवाहिकेत दिला जन्म, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

solapur crime : सोलापुर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने एका लहान गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

solapur crime
solapur crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोलापुर जिल्ह्यात धक्कादायक प्रकरण

point

12 वर्षीय अल्पवयीन मुलीने लहान बाळाला दिला जन्म

point

नेमकं काय घडलं?

Solapur Crime : सोलापुर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने एका लहान गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील ही घटना असून एका 12 वर्षाच्या 8 महिन्याच्या मुलीने लहान बाळाला जन्म दिला. सध्या आई आणि लहान बाळाची तब्येत चांगली असल्याचं समजतंय.

हे ही वाचा : भावाने बहिणीला केलं विधवा, दाजीवर धारधार शस्त्राने केले सपासप वार, 'त्या' कारणावरून उजवा हात कोपऱ्यापासून छाटला

अल्पवयीन मुलीने लहान बाळाला दिला जन्म

अल्पवयीन मुलीने एका लहान बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातून बालविवाहाचं प्रकरण समोर आलं आहे. तरुणी मूळची रायगड येथील असल्याचं सांगण्यात येत आहे.

माढा ग्रामीण रुग्णावाहिकेतून सोलापुर निघालेले असताना मुलीने रुग्णवाहिकेतच लहान बाळाला जन्म दिला. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आई आणि तिचं बाळं दोघेही सुखरूप असल्याचं समजतंय.

सासरच्या कुटुंबियांवर गुन्हा 

याप्रकरणी आता माढा पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीवरून मुलीच्या सासरच्या कुटुंबियांवरील सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यात पती रवींद्र तुकाराम पवार, सासू सुमन पवार, सासरे तुकाराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे आणि मुलाचे वडील यांच्यावर बालविवाह कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पती विरोधात बाललैंगिक अत्याचार आणि बलात्का कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp