Crime news : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विक्षिप्त पुतण्याने काकांवर कोयत्याने हल्ला करत संपवलं, नंतर आरोपीने आपल्याच काकीवर कोयत्याने वार करत जखमी केले. ही घटना सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. मृत काकांचं नाव महताबलाल सिंग आणि त्यांच्या पुतण्याचे नाव मंजय कुमार सिंग असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'तो सतत मला परपुरुषाशी...' पत्नीनं त्रासाला कंटाळून दोघांच्या मदतीनं पतीचा काढला काटा, मृतदेह रेल्वेरुळावर फेकला
पुतण्याने काकावर कोयत्याने वार करत संपवलं
काका महताबलाल सिंगवर पुतण्या मंजय कुमार सिंगने कोयत्याने वार करत संपवलं. या प्रकरणात मृत काकांच्या सून प्रिया कुमारीनं सांगितलं की, 'माझे सासरे मेहताब लाल सिंग जेवणानंतर घराबाहेर उन्हात बसले होते. त्यानंतर मंजय कुमार सिंग कुमार कोयता घेऊन आला आणि त्याने मेहताब लाल सिंगवर हल्ला करण्यास सुरुवात केली. जवळच बसलेल्या मेहताबची पत्नी सकली देवी त्याला वाचवण्यासाठी धावली असता, आरोपी पुतण्याने तिच्यावरही कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात तिचा हात गंभीरपणे जखमी झाला होता. नंतर तिच्या कंबरेला देखील दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी सांगितला घटनाक्रम
मृत महिलेच्या सुनेचा केला की, तिने मदतीसाठी ओरडाओरड केली होती, पण तेव्हा तिच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की, त्यांनी आवाज ऐकला आणि त्यांनी घराकडे धाव घेतली, परंतु हल्लेखोर मंजय कुमार सिंगकडे कोयता होता, त्याने हल्ला करण्याच्या उद्देशाने तिचा पाठलाग करत कोयत्याने वार केले. नंतर काहीजण घाबरून तिथून निघून गेले.
संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, बारांटी पोलीस ठाण्याचे अधिकारी पप्पू कुमार आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी कुटुंबाकडून घटनेची माहिती गोळा केली.
हे ही वाचा : मुंबईत भाजपचा पहिल्यांदाच नाही दुसऱ्यांदा होणार महापौर, 44 वर्षांपूर्वीचा इतिहास घ्या जाणून
सूनेनं सांगितलं की, आरोपी मंजय कुमार सिंगशी पूर्वी कोणताही वाद झाला नव्हता. तो अचानकपणे आला आणि त्याने त्याच्या काका आणि काकूंवर प्राणघातक हल्ला चढलवला, त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचारासाठी त्यांना चांगल्या उपचारांसाठी हाजीपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ADVERTISEMENT











