'तो सतत मला परपुरुषाशी...' पत्नीनं त्रासाला कंटाळून दोघांच्या मदतीनं पतीचा काढला काटा, मृतदेह रेल्वेरुळावर फेकला
crime news : पत्नीने आपल्याच पतीची निर्घृण हत्या केली. त्याच मृत तरुणाचा मृतदेह हा रेल्वे रुळावर आढळून आल्याचं सांगण्यात येत होतं. मृतदेहाचे डोके गायब झाले असता, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृताच्या पत्नीच्या सांगण्यावरून कंत्राटी किलर्सनी ही संपूर्ण घटना घडवून आणली असं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरा हादरून गेला आहे. पत्नीनं नेमकं असं का केलं याची माहिती पुढीलप्रमाणे नमूद केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तो सारखं अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवायला लावत होता
पुरुषावर तलवारीने हल्ला करत शिर धडापासून वेगळे केले
महिलेनं दोघांना हाताशी धरून 'त्याचा' काटा काढला
Crime news : छत्तीसगडमधील बालोदाबाजारमधील भोठीडीह गाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पत्नीने आपल्याच पतीची निर्घृण हत्या केली. त्याच मृत तरुणाचा मृतदेह हा रेल्वे रुळावर आढळून आल्याचं सांगण्यात येत होतं. मृतदेहाचे डोके गायब झाले असता, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृताच्या पत्नीच्या सांगण्यावरून कंत्राटी किलर्सनी ही संपूर्ण घटना घडवून आणली असं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
हे ही वाचा : 'जोवर मनसे आहे तोवर बिहार भवन होऊ देणार नाही', राज ठाकरेंचा 'शिलेदार' कडाडला
पुरुषावर तलवारीने हल्ला करत शिर धडापासून वेगळे केले
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पुरुषावर तलवारीने हल्ला करत शिर धडापासून वेगळे केले. त्यानंतर ते धड रेल्वेरुळावर फेकण्यात आले होते, तर मृतदेहाचे शिर हे दुसऱ्या ठिकाणी नेऊन जमिनीत पुरण्यात आले होते, ही घटना हातबंद पोलीस ठाणे परिसरात घडली होती. या प्रकरणातील मृताचे नाव गस कुमार जोशी (वय 39) असे आहे. तर पत्नीचं नाव कुसुम जोशी असे आहे.
तो सारखं अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवायला लावत होता
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. तिने पोलिसांना सांगितलं की, तिचा पती बराच काळ मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. नंतर तिने आरोप केला की, तो तिला अनैसिर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास दबाव आणत होता. याच त्रासाला कंटाळून पीडितेनं तिच्या पतीला संपवण्याचा निर्णय घेतला होता.
महिलेनं दोघांना हाताशी धरून 'त्याचा' काटा काढला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुमने तिचे मामा राजेश भारती यांची मदत घेत दारासिंग अनंत आणि करण अनंत या दोघांशी संपर्क साधला. नंतर त्यांना 40 हजार रुपयांची सुपारी देऊन गस कुमार जोशीला मारण्याचा कट रचला. गुन्हा करण्यासाठी, कुसुम तिच्या पतीला काही बहाण्याने तिच्या मामाच्या घरी घेऊन गेली होती. त्याच ठिकाणी दोघेजण त्याच ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी गस कुमारला दारू पाजली आणि नंतर बेदम मारहाण केली. नंतर तो बेशुद्ध पडला, त्याला एका गाडीत बसवले आणि सुमारे 20 किमी अंतरावर हातबंध-भाटपारा रेल्वे रुळावर नेले, नंतर तलवारीने हल्ला करत मुंडकं छाटलं. त्यानंतर आरोपीने मृतदेहाचे शरीर रेल्वे ट्रॅकवर फेकून दिले.










