'जोवर मनसे आहे तोवर बिहार भवन होऊ देणार नाही', राज ठाकरेंचा 'शिलेदार' कडाडला

मुंबई तक

Bihar Bhavan : मुंबई पोर्ट ट्रसच्या जागी राज्य सरकार बिहार भवन बांधणार असल्याची चर्चा आहे. बिहार भवन बांधण्यासाठी परवानगी देखील मिळाली आहे. यावर मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 19 जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना मनसे जोवर आहे तोवर बिहार भवन होऊ देणार नाही, असं वक्तव्य केलं.  

ADVERTISEMENT

Bihar Bhavan
Bihar Bhavan
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागी बिहार भवन?

point

नेमकं काय म्हणाले यशवंत किल्लेदार? 

point

नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर  

Bihar Bhavan : मुंबई पोर्ट ट्रसच्या जागी राज्य सरकार हे मुंबईत बिहार भवन बांधणार असल्याची चर्चा आहे. हेच बिहार भवन बांधण्यासाठी परवानगी देखील देण्यात आली आहे. यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी 'जोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोवर आम्ही बिहार भवन बांधून देणार नाही', असं वक्तव्य केलं. ते 19 जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. त्यानंतर नवनिर्वाचित भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

हे ही वाचा : मेट्रोत 16 वर्षाच्या मुलाने फॉरेनर महिलेला केला चुकीचा स्पर्श, म्हणाली, 'मी इथून पुढं तुमच्या देशात...' लाज आणणारा प्रकार

नेमकं काय म्हणाले यशवंत किल्लेदार? 

बिहारभवन आम्ही होऊ देणार नाही. इथं महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर अवकाळी संक्रांत आलेली आहे. मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे. महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेला आहेत. अनेक गोष्टी असून त्याकडे लक्ष द्यायचं सोडून तीनशे चौदा कोटी वीस लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहेत. माझं म्हणणं असं की, राहण्यासाठी आणि खाण्यासाठी एवढा खर्च करण्यापेक्षा त्यांनी बिहारमध्येच उपचारासाठी मोठं हॉस्पिटल उभारावं. इथं आमचे प्रश्न सुटत नसल्याने आमच्या बोकांडीवर हे कशाला? महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोवर आहे, तोवर बिहारभवन करू देणार नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. त्याच्या या टीकेला भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. 

नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर  

ते म्हणाले की, प्रत्येक राज्यात एक भवन असतं. काश्मीरमध्ये देखील महाराष्ट्र भवन आहे. उत्तर प्रदेशातील आयोध्यात महाराष्ट्र भवन होत आहे. त्या लोकांनी याला कुठे विरोध केला होता, राज्य आपलं, देश आपला आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी भवनं असतात. यामुळे महाराष्ट्रात जर बिहार भवन असेल तर त्यात गैर वाटण्यासारखं काय आहे? असा प्रश्न नवनाथ बन यांनी उपस्थित केला होता. 

हे ही वाचा : मुंबईच्या महापौर पदाबाबत एकनाथ शिंदे यांचं सुचक वक्तव्य म्हणाले, 'महापौर हा...'

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागी बिहार भवन?

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागी बिहार भवन बांधलं जाणार आहे. यासाठी 30 मजली इमारत बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 300 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अत्याधुनिक इमारतीत अधिकारी आणि प्राशासकीय अधिकाऱ्यांना सोय देण्यात येणार आहे. यासाठी 178 खोल्यांचं बांधकाम बिहार भवनात होणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp