तरुणाच्या बाईकवर मुलगी गेली फिरायला, तिला शेतात नेत 'त्या' कारणावरून चाकूने सपावर वार करत संपवलं, मृतदेह पुरत...

Crime News : एका तरुणीने ओळखीच्याच तरुणाच्या दुचाकीवरून प्रवास केला. त्यानंतर तरुण त्या मुलीला शेतात घेऊन गेला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. तरुणाने महिलेचा मृतदेह एका झाडाखाली पुरण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:19 PM • 18 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीचे तरुणासोबतच प्रेमसंबंध

point

तरुणाची 'त्या' कारणावरून सटकली आणि चाकूने हल्ला करत संपवलं

Crime News : एका तरुणीने ओळखीच्याच तरुणाच्या दुचाकीवरून प्रवास केला. त्यानंतर तरुण त्या मुलीला शेतात घेऊन गेला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. तरुणाने महिलेचा मृतदेह एका झाडाखाली पुरण्यात आला होता. पण नंतर नागरिकांना पुरलेल्या मृतदेहाचा हात दिसला. हे चित्र बघून एकच गोंधळ उडून गेला. पोलिसांनी घटनास्थळी धाव गेत मृतदेह ताब्यात घेतला. हत्या करणारा तरुण कोण आहे पोलीस याचा तपास घेत आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कोल्हापुरात डॉक्टर लेकीनं 78 वर्षीय वडिलांच्या बोटाचा चावा घेत तुकडा पाडला, अंगावर गाडी घालत शिवीगाळ अन् धमकी...

नेमकं काय घडलं? 

या हत्येप्रकरणात पोलिसांनी सैन्यातील सैनिक हर्षवर्धन सिंग उर्फ दीपकला ताब्यात घेत अटक केली. हर्षवर्धन सिंगने केलेला हा गुन्हा अत्यंत लज्जास्पद असल्याचा आरोप आहे. तसेच हर्षवर्धनने इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या साक्षी यादव (वय 17) या मुलीची हत्या केली आहे. तसेच हर्षवर्धने नुकतेच एका मुलीशी विवाह ठरला होता. तेव्हा साक्षीने हर्षवर्धनला विवाह करण्यापासून रोखले असता, हर्षवर्धनने हे पाऊल उचलले. साक्षीला हर्षवर्धनशी विवाह करायचा होता, अशी माहिती समोर आली. पण, हर्षवर्धनने विवाह करायचा नसल्याने तिलाच संपवलं. ही घटना लाखरावन या गावात घडल्याचं सांगण्यात येत आहे. 

आरोपी अटकेत 

संबंधित प्रकरणाचा तपास केल्यानंतर, पोलिसांनी जुना पूल मानसैता नदीजवळ, थरवाई पोलीस ठाणे परिसरातील कुसुंगूर गावातील रहिवासी असलेल्या आरोपी हर्षवर्धनला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व शस्त्र आणि अवजारे जप्त केली. 

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षेसाठी गेला तरुण, 25 वर्षीय तरुणीशी प्रेम अन् कॅफेत अत्याचार, गर्भपात करत... मोठं कांड

डीसीपी गंगानगर झोन पुढे म्हणाले की, थरवाई आणि कॅन्ट पोलीस ठाणे शहर आणि गंगानगर एसओजी पथकांसह, सर्वप्रथम अज्ञात महिलेचा मृतदेह ओळखला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्याचा प्रयत्न केला. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी हा विद्यार्थीनीला एका दुचाकीवरून घेऊन जात होता. विद्यार्थ्याच्या बॅगेत आरोपीचा मोबाईल नंबर असलेली एक नोटबुक देखील आढळली. पोलीस या मोबाईल नंबरची तपासणी करत आहेत. 

    follow whatsapp