तरुणीचा चेहरा विद्रुप होईपर्यंत चाकूने सपासप वार, घटनेनं परिसर हादरून गेला, ओळखीच्याच व्यक्तीने 'त्या' रात्री काढला काटा

crime news : एका तरुणीचा चेहरा विद्रुप होईपर्यंत सपासप वार करत हत्या केली. या भयानक घटननेनं परिसर हादरून गेला आहे, नेमकं काय घडलं?

crime news

crime news

मुंबई तक

09 Oct 2025 (अपडेटेड: 09 Oct 2025, 04:07 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीचा चेहरा विद्रुप होईपर्यंत सपासप वार

point

घटननेनं परिसर हादरून गेला

Crime News : एका तरुणीचा चेहरा विद्रुप होईपर्यंत सपासप वार करत हत्या केली. या भयानक घटननेनं परिसर हादरून गेला आहे. दिल्लीतील कोटला मुबारकपूर भागात तरुणी भाडेतत्त्वावर राहत होती. त्याच खोलीत तरुणीचा खून करण्यात आला. पोलिसांनी पीसीआर कॉलद्वारे संपर्क करत घटनेची एकूण माहिती मिळवली. ही घटना मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. खून करण्यात आलेल्या तरुणीचं नाव साक्षी (वय 25) असे होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : रासायनिक टँकरची सिलिंडरने भरलेल्या वाहनाला धडक, 200 सिलिंडरचा मोठा स्फोट, पाच वाहने जळून खाक आणि...

तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

तरुणीचा मृतदेह खोलीत रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडला होता. या घटनेची एकूण माहिती मिळताच, एएसआय राजेंद्र सिंह त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. ते खोलीत जात असताना खोलीच्या बाहेरील पायऱ्यांवर रक्ताचे डाग दिसू लागले होते. पोलीस खोलीत गेले असता, तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 

पोलिसांनी सुरुवातीला तपास केला असता त्यांना दिसून आले की, साक्षी तिच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत खोलीत होती. त्यांच्यात काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. याच वादातून आरोपीचा पारा चढला आणि साक्षीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर चाकूने सपावर वार केले , अशातच तिचा मृत्यू झाला. 

हे ही वाचा : तरुणीचा प्रियकरावर जडला जीव, कुटुंबीय म्हणाले परत या लग्न लावून देऊ, पाच भावांनी मिळून... सैराटपेक्षा धक्कादायक शेवट

या प्रकरणात सध्या, एफएसएल पथक आणि गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर त्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केली. शिवाय, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आणि आरोपींचा शोध घेताना दिसतात. दरम्यान, दिल्लीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. एवढंच नाहीतर दिल्लीत महिला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

    follow whatsapp