तरुणीचा प्रियकरावर जडला जीव, कुटुंबीय म्हणाले परत या लग्न लावून देऊ, पाच भावांनी मिळून... सैराटपेक्षा धक्कादायक शेवट
crime news : प्रेम विवाहातून तरुणीच्या पाच भावांनी मिळून आपल्या बहीण आणि भाऊजीची हत्या केली आहे. हत्या केलेल्या पतीचं नाव दुखन साव आणि पत्नीचं नाव मुन्नी गुप्ता असे आहे, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेमविवाह केला म्हणून बहिणीसह दाजीला संपवलं

सैराटची पुनरावृत्ती
Crime News : प्रेम विवाहातून तरुणीच्या पाच भावांनी मिळून आपल्या बहीण आणि भाऊजीची हत्या केली आहे. हत्या केलेल्या पतीचं नाव दुखन साव आणि पत्नीचं नाव मुन्नी गुप्ता असे आहे. या दोघांशी हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिले. आपल्या बहिणीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात घडली आहे, या घटनेत तिघेजण फरार असून इतर दोघांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : मुंबई : उंच इमारतीवरुन वीट कोसळली अन् कामावर निघालेल्या तरुणीच्या डोक्यावर पडली, रुग्णालयता नेताच...
नेमकं प्रकरण काय?
संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी मुन्नी गुप्ता आणि तरुण दुखन साव यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. पण,कुटुंबियांनी त्यांच्या नातेसंबंधाला विरोध केला होता. लग्नानंतर दोघेही गुजरातमध्ये जाऊन राहू लागले होते. त्यानंतर कुटुंबियांनी दोघांनाही सांगितलं की, तुम्ही परत या आम्ही तुमचं धुमधडाक्यात लग्न लावून देतो, असं सांगून मुन्नूी गुप्ता हिच्या कुटुंबीयांनी या दोघांनाही परत बोलावलं. त्यानंतर मुन्नी गुप्ता आणि दुखन साव हे गुजरातहून मिर्झापूरला आले. तिथे मु्न्नी हिचा भाऊ त्यांना घेण्यासाठी आला.
पोलीस ठाण्यातील हद्दीतील झाडीत फेकून दिले मृतदेह
भावांनी मिळून एक कट रचला होता. त्या कटानुसार, मुन्नी आणि दुखन यांना गाडीत बसवून बिहारच्या दिशेने नेण्यात आले. त्यानंतर आरोपींनी हाथीनाला परिसरातील काही गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी मुन्नी आणि दुखनची हत्या करण्यात आली, त्यानंतर मृतदेह हा एका पोलीस ठाण्यातील हद्दीतील झाडीत फेकून देण्यात आला होता.
हे ही वाचा : सचिन घायवळ शस्त्रपरवाना प्रकरण तापलं, मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी; सुषमा अंधारे आक्रमक
या प्रकरणात आरोपी पाच भावांपैकी अवधेश, राजेश आणि मुकेश हे तिघेजण घटनास्थळावरून फरार झाले. तसेच यातील मुन्ना आणि राहुल या दोघांना अटक करण्यात आली.