Crime News : देशाची राजधानी दिल्लीत काही वर्षांपूर्वी निर्भयासारखी दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनं केवळ दिल्ली नाहीतर पुरता देश हादरून गेला होता. या घटनेनंतर दिल्लीत कुठेतरी महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचललं जाईल, अशी आशा होती. मात्र, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणवीर आला आहे. अशीच एक घटना दिल्लीतील वसंतनगर येथे घडली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईची खबर: कबुतरांना खायला दाणे टाकले अन् झाला गुन्हा दाखल! मुंबईत पहिल्यांदाच घडलं असं.. कारण काय?
एका महिलेचं लैंगिक शोषण करून तिच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना बुधवारी घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गोळीबार करण्यात आलेल्या दोघांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. एका आरोपीचे नाव अजूबैर सफी, तर दुसऱ्याचं नाव अर्जुन सुखला असे आहे. दोघांवरही पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस तपासातून तरुणीची माहिती आली समोर
ज्या तरुणीवर गोळीबार करण्यात आला ती तरुणी एका सलूनमध्ये हेड मॅनेजर म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी सांगितले की, ही घटना बुधवारी घडली. बुधवारी दोन जण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी महिलेवर गोळीबार केला.
या घटनेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणीने अजूबैर सफीवर मागील वर्षी पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी हा जामीनावर बाहेर आल्यानंतर तरुणीवर गोळीबार केला. याचविरोधात वसंत विहार पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 109 आणि 3 (5) अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : कलात्मक राजयोगामुळे 'या' राशीतील लोकांचे चमकेल नशीब, काही राशीतील लोकांना शेअरबाजार, लॉटरीतून चांगला परतावा मिळणार
लैंगिक शोषण आणि गोळीबाराचं कारण आलं समोर
आरोपी अजूबैर सफीने सांगितलं की, त्याच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्याच्या मनात महिलेविषयी राग होता. तो सतत महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्याने अनेकदा महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, पण त्याच्याशी बोलली नाही. यानंतर महिलेनं गोळीबार केला.
प्रश्न : घटना कुठे घडली?
दिल्लीतील वसंतनगर पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.
प्रश्न : आरोपींची नावे काय आहेत?
अजूबैर सफी आणि अर्जुन सुखला असे नाव आहे.
प्रश्न : लैंगिक शोषण आणि गोळीबाराचं कारण काय?
लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्याच्या मनात महिलेविषयी राग होता.
ADVERTISEMENT
