जिमच्या लेडीज टॉयलेटमध्ये पीडितेवर अत्याचार, ट्रेनरला तुरूंगवासाची शिक्षा

सुशांत काळे

29 Nov 2026 (अपडेटेड: 29 Nov 2026, 05:46 PM)

crime news : लैंगिक अत्याचार प्रकरणात हैदराबादेतील न्यायालयाने जिम ट्रेनरला 20 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद मौजम अली (39) असे या दोषीचे नाव असून, न्यायालयाने त्याला 8 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

crime news

crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जिमच्या लेडीज टॉयलेटमध्ये पीडितेवर अत्याचार

point

फ्लॅटमध्ये जबरदस्तीने लैंगिक छळ केल्याचा आरोप

Crime News : नऊ वर्षांपूर्वीच्या 2017 मध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात हैदराबादेतील न्यायालयाने जिम ट्रेनरला 20 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद मौजम अली (39) असे या दोषीचे नाव असून, न्यायालयाने त्याला 8 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सायबराबादच्या रायदुर्गम पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली होती. भारतीय दंड संहित IPC) च्या कलम 376, 448, 506 आणि 354D (I) अन्वये त्याला दोषी ठरवण्यात आले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मालेगाव: झाडाची बोरं तोडल्याने बेदम मारहाण, तरुणी रस्त्याच्या कडेला कोसळली

जिमच्या लेडीज टॉयलेटमध्ये पीडितेवर अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी 3017 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास 40 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आरोपी गाचीबोवली येथील रामकी टॉवर्समध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत होता. जानेवारी2015 पासून तो जिममधील लेडीज टॉयलेटमध्ये तिचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला होता.

फ्लॅटमध्ये जबरदस्तीने लैंगिक छळ अन् ब्लॅकमेल

एवढ्यावरच न थांबता आरोपी नंतर पीडितेच्या फ्लॅटमध्ये जबरदस्तीने शिरला आणि त्याने तिचा अनेक वेळा लैंगिक छळ केला, असाही आरोप आहे. शिवाय, तिला सातत्याने धमकावले जात होते. पीडिता आणि पतीची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तसेच, महिलेचा मोबाईल फोन व सोशल मीडिया अकाउंट हॅक करून तिचे फोटो मिळवल्याचेही तपासात समोर आले.

हे ही वाचा : Astrology : नोव्हेंबर अखेरीस शुक्र आणि गुरूची युती, ‘या’ राशींचे बदलेल भाग्य

वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून पीडितेने 11 फेब्रुवारी 2017 रोजी पतीला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर दोन दिवसांनी, 13 फेब्रुवारी रोजी तिने रायदुर्गम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत साक्षीदारांचे जबाब नोंदवले, CCTV फुटेजसह इतर तांत्रिक व भौतिक पुरावे गोळा केले आणि आवश्यक साहित्य जप्त केले. यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले.