दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, तरुणीची बॉयफ्रेंडने केली हत्या

सुमित भुजबळ

29 Nov 2026 (अपडेटेड: 29 Nov 2026, 10:53 AM)

Crime News : बंगळुरूमधील लॉजमध्ये 22 वर्षीय नर्सिंग पदवीधर तरुणीची प्रियकराकडून हत्या करण्यात आली. दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय,

point

तरुणीची बॉयफ्रेंडने केली हत्या

Crime News : बंगळुरूतील कॉटनपेट परिसरात एका लॉजमध्ये 22 वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत प्रियकराने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. मृत तरुणीचे नाव गंगा असून, ती केरळममधील रहिवासी होती. तर आरोपीचे नाव गोकुल कृष्ण (वय 23) असे आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 

हे वाचलं का?

अधिकची माहिती अशी की, गंगा आणि गोकुल कृष्ण हे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. दोघांनीही नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात ते बंगळुरूमध्ये आले होते. दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी दोघांनी बंगळुरूमधील कॉटनपेट परिसरातील ओटीसी रोडवरील एका लॉजमध्ये खोली घेतली होती.

हेही वाचा : जेलच्या चार भिंतीआड महिला गार्डसोबत काय घडलं? नाईट ड्युटीवर असताना जेलरने बलात्कार केल्याचा आरोप!

 दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉजमधील खोलीत असताना गोकुल कृष्ण आणि गंगा यांच्यात वाद झाला. गंगाचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय गोकुलला होता. याच संशयावरून त्याने गंगासोबत वाद घातला. हा वाद पुढे वाढत गेल्याने त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. गोकुलने गंगाला मारहाण करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. मात्र, गोकुलला गंगाच्या दुसऱ्या तरुणासोबतच्या संबंधांचा संशय नेमका कशामुळे आला आणि त्याने तिची हत्या कशा प्रकारे केली, याबाबत पोलिसांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही.

हेही वाचा : डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास शरद पवार इंडिया आघाडीत असतील का? राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले...

बेडवर आणि जिन्यावर रक्ताचे डाग, कर्मचाऱ्यांना कसं समजलं? 

दरम्यान, शुक्रवारी सकाळी हा प्रकार लॉजमधील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. खोलीतील बेडवर आणि जिन्यावर रक्ताचे डाग दिसून आल्यानंतर कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लॉजमधील खोलीची पाहणी करून तपास सुरू केला. या प्रकरणात गोकुल कृष्णला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील उपलब्ध पुराव्यांची तपासणी केली जात असून, हत्येमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.