पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीचे हाल, अन् घरातून 'ती' माहिती मिळताच पायाखालची जमीन सरकली

सुमित भुजबळ

• 08:55 AM • 28 Nov 2026

Crime News : 40 वर्षीय महिला आपल्या 35 वर्षीय प्रियकरासोबत घरातून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. घरातून जाताना सुनाांचे दागिने आणि 40 हजार रुपये नेल्याचा आरोप पतीने केला आहे.

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीचे हाल,

point

अन् घरातून 'ती' माहिती मिळताच पायाखालची जमीन सरकली

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलांची आई असलेली 40 वर्षीय महिला आपल्या 35 वर्षीय प्रियकरासोबत घर सोडून पळून गेली. विशेष म्हणजे, घरातून निघताना तिने सुनांचे दागिने आणि 40 हजार रुपये रोख रक्कमही सोबत नेल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. महिलेच्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कामता प्रसाद आदिवासी असे तक्रारदार पतीचे नाव असून, ते झाशीतील मऊरानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्यावरी गावात राहतात. पत्नी घरातून अचानक निघून गेल्याने कुटुंबीय तिचा शोध घेण्यासोबतच पोलिसांकडेही धाव घेत आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : दोघा भावांनी नूडल्स खाल्ले, घरी येताच एकाचा जीव गेला, दुसरा ICU मध्ये दाखल; नेमकं काय घडलं?

कुटुंबीयांनी समजावून सांगूनही प्रियकराशी बोलणे आणि भेटणे सुरू

कामता प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्यांची पत्नी सुखवती त्यांच्यासोबत मजुरीच्या कामासाठी भिंड-मुरैना परिसरातील वीटभट्ट्यांवर गेली होती. त्याच ठिकाणी तिची ओळख राठ तहसीलमधील बिहुनी गावात राहणाऱ्या अमर सिंह प्रजापती याच्याशी झाली. सुरुवातीला झालेली ओळख हळूहळू जवळीकीमध्ये बदलली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर सुखवती आणि अमर यांच्यातील बोलणे वाढल्याचे पतीचे म्हणणे आहे. पत्नीच्या मोबाईलमध्ये अमरचा क्रमांक अनेकदा दिसल्याचेही कामता प्रसाद यांनी सांगितले. तसेच दोघांमधील संभाषणही आपण ऐकले होते, असा त्यांचा दावा आहे. घरातील सुनाांनाही सुखवतीच्या वागण्यावर संशय येऊ लागला होता. मात्र, कुटुंबीयांनी समजावून सांगूनही तिचे प्रियकराशी बोलणे आणि भेटणे सुरूच होते.

हेही वाचा : नवऱ्याचा बिझनेस हडपण्यासाठी बायकोचा खतरनाक प्लॅन, रोज हळूहळू विष दिलं; पण घडलं भलतंच!

शेवटी प्रियकरासोबत पळून गेली, कुटुंबासमोर आता आर्थिक अडचणी

कामता प्रसाद यांनी पत्नीला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. काही वेळा तिला पुन्हा घरीही आणले होते. मात्र, त्यानंतरही तिचे अमरसोबतचे संबंध कायम राहिले. काही दिवसांपूर्वी कामता प्रसाद आपल्या मुलाच्या उपचारासाठी झाशी येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत सुखवतीने घरातून सुनाांचे दागिने आणि जवळपास 40 हजार रुपये रोख रक्कम घेतली. त्यानंतर ती अमर सिंह प्रजापती याच्यासोबत घरातून निघून गेली. पतीच्या म्हणण्यानुसार, घरातून जाताना तिने दागिने आणि रोख रक्कमही सोबत नेली. या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेषतः सुना आणि लहान नातवांवर या घटनेचा परिणाम झाला आहे. रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबासमोर आता आर्थिक अडचणीही निर्माण झाल्या आहेत.

पत्नी घरातून दागिने आणि पैसे घेऊन प्रियकरासोबत निघून गेल्यानंतर कामता प्रसाद यांनी मुलगा आणि सुनेसह मऊरानीपूर पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी पत्नी सुखवती आणि तिचा प्रियकर अमर सिंह प्रजापती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पत्नीने घरातून दागिने आणि सुमारे 40 हजार रुपये रोख घेतल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, दोन मुलांची आई आणि दोन लहान नातवांची आजी असलेल्या महिलेने प्रियकरासोबत घर सोडल्याच्या या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. पती आणि कुटुंबीय पोलिसांकडे तक्रार करून पुढील कारवाईची प्रतीक्षा करत आहेत.