नागपूर हादरले! आधी प्रियकराला पळवून लावलं, नंतर 19 वर्षीय तरुणीवर जंगलात बलात्कार

योगेश पांडे

27 Nov 2026 (अपडेटेड: 27 Nov 2026, 10:05 AM)

नागपूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Nagpur Crime

Nagpur Crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

19 वर्षीय तरुणीवर बलात्कार

point

नागपूरमध्ये खळबळ

point

जंगलात काय घडलं?

Nagpur Crime : नागपूरच्या सोनेगाव तलावाजवळील जंगलात एका प्रेमी युगुलावर हल्ला करून 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (25 नोव्हेंबर) रात्री सुनसान जंगलात प्रेमी युगुल बसले असताना एक तरुण तिथे आला. त्याने आधी तरुणीच्या प्रियकराला मारहाण करून तिथून पळवून लावले. त्यानंतर तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने तरुणीचे व्हिडिओही काढले आणि तिच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

हे वाचलं का?

24 तासानंतर तक्रार दाखल

या घटनेनंतर पीडित तरुणीने जवळपास 24 तासांनी कुटुंबीयांसह सोनेगाव पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच सोनेगाव पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला. जंगलात येण्या-जाण्याच्या मार्गावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके कामाला लागली आहेत.

हे ही वाचा : Mumbai NCP Meeting : मुंबईतील एनसीपीच्या बैठकीत काय ठरलं?

आरोपी फरार

नागपूर शहर पोलीस गुन्हे शाखेचे डीसीपी दीपक अग्रवाल यांनी या घटनेत एका आरोपीचा सहभाग असल्याची माहिती दिली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, घटनेला 48 तास उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : पुणे : मंदार किवळेला जुन्या प्रकरणात जामीन कसा मिळाला होता?

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान, या घटनेमुळे सोनेगाव तलावाजवळील जंगल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी या भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. सुनसान ठिकाणी अशा गंभीर घटना घडत असताना पोलिसांची गस्त आणि सुरक्षेची व्यवस्था पुरेशी आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढून नागपूर पोलीस त्याला कधी अटक करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.