Beed Crime : विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या प्राध्यापकाकडूनच वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्राध्यापक डॉक्टरला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कंपनीतील कामावरुन वाद, कामगाराने सुपरवायजरची केली निर्घृण हत्या, तळेगाव MIDC मध्ये काय घडलं?
डॉक्टरांचा पीडितेला अयोग्य स्पर्श
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी २२ वर्षांची असून ती बीडमधील एका होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. ती पीसीओडी (PCOD) आजारावर नियमित तपासणी आणि उपचारासाठी महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेली होती. त्यावेळी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिस अहमद याने तिच्याशी लगट करत अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
जानेवारी 2026 पासून उपचाराच्या नावाखाली हा छळ सुरू असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. गेल्या 11 महिन्यांत आरोपीने तीन ते चार वेळा गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केल्यास परीक्षेत कमी गुण देण्याची तसेच पाच वर्षे एकाच वर्गात अडकवून ठेवण्याची धमकीही त्याने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा : सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित पॅनेलची एकहाती सत्ता, मोहिते-पाटलांना धक्का!
आरोपी अटकेत
शैक्षणिक भवितव्याच्या भीतीपोटी विद्यार्थिनीने काही काळ हा प्रकार सहन केला. मात्र, अखेर तिने हिम्मत दाखवत शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी डॉ. अनिस अहमद याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












