कोल्हापूर: भरधाव वेगानं आलेल्या कारनं सख्ख्य़ा भावांना उडवलं अन्..

Kolhapur News : भरधाव वेगाने आलेल्या एका कारने रस्त्याच्या कडेला खेळणाऱ्या दोन सख्या भावांच्या अंगावरून गेल्याची अंगावर काटा आणणारी घटना कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव परिसरात घडली आहे.

Kolhapur accident news

Kolhapur accident news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भरधाव वेगानं आलेल्या कारनं सख्ख्य़ा भावांना उडवलं

point

कोल्हापूरची घटना

Kolhapur News : भरधाव वेगाने आलेल्या एका कारने रस्त्याच्या कडेला खेळणाऱ्या दोन सख्या भावांच्या अंगावरून गेल्याची अंगावर काटा आणणारी घटना कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव परिसरात घडली आहे. या अपघातात 8 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई: घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शौचालयात 60 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार

नक्की काय घडले?

शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गोकुळ शिरगाव येथील सातबारा पार्क कॉलनीत मंथन बोडके (वय 8), महेश बोडके (वय 6), त्रिशा मुगुळखुळ आणि उत्कर्ष बोडके हे चार चिमुकले रस्त्याच्या कडेला खेळत होते. याच दरम्यान, तेथे आलेल्या एका भरधाव कारने मंथन आणि महेश या दोन सख्या भावांना धडक देत त्यांच्या अंगावरून कार नेली.

अपघातानंतर काही क्षणांतच दोन्ही मुले कारच्या खालून बाहेर आली आणि कार थोड्या अंतरावर जाऊन थांबली. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक, बोडके कुटुंबीय तसेच कारमधील चार जणांनी तातडीने धाव घेत गंभीर जखमी झालेल्या मंथन सोमनाथ बोडके याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

कारमधील तरुण कॉलेजला निघाले होते

मिळालेल्या माहितीनुसार, सातबारा पार्क कॉलनीजवळ एका कॉलेजचे चार विद्यार्थी भाड्याने राहतात. दुपारी हे चौघेही आपल्या कारमधून कॉलेजला जात असताना हा अपघात घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून अपघाताचे दृश्य अत्यंत भीषण आहे.

हे ही वाचा : 'शरद पवारांसाठी राज्यसभेची जागा सोडली, आता त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार..' महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट तुफान व्हायरल

पोलिसांकडून तपास सुरू

या अपघाताची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या घटनेचा अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस करत आहेत.