मुंबई: घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शौचालयात 60 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार
Mumbai Crime News : घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या सार्वजनिक शौचालयात गुरुवारी रात्री उशिरा 60 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. विरोध केल्यानंतर आरोपीने त्यांच्या कपाळावर मारहाण करून त्यांना जखमी केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
20 ते 25 वयोगटातील तरुण शौचालयात शिरला
60 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार
Mumbai Crime News : घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या सार्वजनिक शौचालयात गुरुवारी रात्री उशिरा 60 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. विरोध केल्यानंतर आरोपीने त्यांच्या कपाळावर मारहाण करून त्यांना जखमी केले. मात्र, लोहमार्ग पोलिसांनी (GRP) वेगाने तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शुक्रवारी 25 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
हे ही वाचा : 'शरद पवारांसाठी राज्यसभेची जागा सोडली, आता त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार..' महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट तुफान व्हायरल
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ठाणे जिल्ह्यातील खडावली येथील रहिवासी असून रोजंदारी करून उदरनिर्वाह करतात. गुरुवारी त्या कामासाठी आपल्या 18 वर्षीय मुलीसोबत घाटकोपर येथे आल्या होत्या. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर मायलेकी खडावलीला जाण्यासाठी रात्री घाटकोपर स्थानकावर पोहोचल्या. मुलगी फलाट क्रमांक 2 वर गाडीची वाट पाहत असताना, रात्री सुमारे 11:12 वाजता वृद्ध महिला स्थानकातील सार्वजनिक शौचालयात गेल्या. त्या वेळी शौचालयाच्या परिसरात कोणताही कर्मचारी किंवा सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता.
20 ते 25 वयोगटातील तरुण शौचालयात शिरला
स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झालेल्या चित्रणानुसार, महिला आत गेल्यानंतर काही सेकंदांतच 20 ते 25 वयोगटातील एक तरुण शौचालयात शिरला आणि त्याने आतून दार बंद केले. आरोपीने महिलेवर अत्याचार केला आणि तिने प्रतिकार केल्यावर तिच्या कपाळावर जोरात वार केला. त्यानंतर रात्री 11:19 वाजता तो शौचालयातून बाहेर पडून घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या दिशेने पसार झाला.
रात्री सुमारे 11:22 च्या सुमारास जखमी आणि घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आलेल्या महिलेने घडलेला प्रकार मुलीला सांगितला. त्यानंतर दोघींनी फलाट क्रमांक 4 वरील लोहमार्ग पोलीस (GRP) मदत केंद्राशी संपर्क साधून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा बलाला (RPF) तातडीने पाचारण करण्यात आले. महिला पोलीस अधिकाऱ्याने पीडितेची विचारपूस केल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.
हे ही वाचा : लॉजमध्ये तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ, प्रियकराला 'तो' संशय; नेमकं काय घडलं?
आरोपीवर गुन्हा दाखल
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी स्थानक परिसर तसेच घाटकोपर मेट्रो स्थानकाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातील स्पष्ट ओळखीच्या आधारे सापळा रचून घाटकोपरमधील असल्फा भागातून तस्लीम नूर मोहम्मद (25) या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
