डिलिमिटेशनवरुन INDIA आघाडीची खलबतं सुरू, राष्ट्रवादीची मात्र माघार; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्यांच्या आरोपांनंतर इंडिया आघाडीच्या बैठकीपासून दूर राहण्याची भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतली आहे.

ADVERTISEMENT

INDIA Bloc Meeting
INDIA Bloc Meeting
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक

point

दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक

point

राष्ट्रवादी शरद पवार गटाची गैरहजेरी

INDIA Bloc Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके हे दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर केलेल्या आरोपांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्यांच्या आरोपांनंतर इंडिया आघाडीच्या बैठकीपासून दूर राहण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.

खासदारांची सुप्रिया सुळेंना विनंती

खासदार सुप्रिया सुळे या 30 नोव्हेंबर रोजी दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. मात्र, इंडिया आघाडीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असतानाही या बैठकीत सहभागी होऊ नये, अशी विनंती पक्षातील सर्व खासदारांनी सुप्रिया सुळे यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे पक्षाच्या खासदारांमध्ये नाराजी असल्याचे या घडामोडींवरून दिसून येत आहे.

हे ही वाचा : 'शरद पवारांसाठी राज्यसभेची जागा सोडली, आता त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार..' महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट तुफान व्हायरल

इंडियाच्या बैठकीला कोणाची उपस्थिती?

दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, सीपीआय (एम), आरएलडी, सीपीआय, आरएसपी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांनी हजेरी लावली आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस गटाचे खासदारही या बैठकीला उपस्थित आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचाही उपस्थितांमध्ये समावेश आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! NCP शरद पवार गटाकडून भाजप सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकला पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांनी केलं जाहीर

राहुल गांधी दाखल

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी वाड्रा, उत्तर प्रदेशचे एआयसीसी प्रभारी राजेंद्र पाल गौतम, काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि काँग्रेस नेते पवन खेरा हे देखील खरगे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने घेतलेल्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.