लॉजमध्ये तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ, प्रियकराला 'तो' संशय; नेमकं काय घडलं?

पृथ्वीराज पाटील

28 Nov 2026 (अपडेटेड: 28 Nov 2026, 11:48 AM)

केरळमधील एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा लॉजमध्ये मृदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लॉजमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह

point

प्रियकराला अटक

point

नेमकं काय घडलं?

Crime News : केरळममधील 22 वर्षीय नर्सिंग पदवीधर तरुणीची बंगळुरूमध्ये तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूच्या कॉटनपेट परिसरातील एका लॉजमध्ये ही घटना घडली. गंगा असे मृत तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर गोकुळ कृष्ण (वय 23) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?

दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध

गंगा आणि गोकुळ कृष्ण हे दोघेही नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केलेले होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. नोकरीच्या शोधात दोघेही बंगळुरूमध्ये आले होते. 26 नोव्हेंबर रोजी त्यांनी कॉटनपेट परिसरातील ओटीसी रोडवरील एका लॉजमध्ये खोली घेतली होती. याच ठिकाणी गोकुळने गंगाच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

हे ही वाचा : 'शरद पवारांसाठी राज्यसभेची जागा सोडली, आता त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार..' महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट तुफान व्हायरल

लॉजमध्ये काय घडलं?

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा वाद इतका विकोपाला गेला की गोकुळने गंगाला मारहाण केली आणि तिची हत्या केली. मात्र, गंगावर संशय घेण्यामागचे नेमके कारण काय होते आणि आरोपीने तिची हत्या कशा पद्धतीने केली, याबाबत पोलिसांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. दरम्यान, शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सकाळी लॉजमधील कर्मचाऱ्यांच्या ही घटना लक्षात आली. खोलीतील बेडवर आणि जिन्यावर रक्ताचे डाग दिसल्यानंतर त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

हे ही वाचा : वेदर रिपोर्ट : कुठे जोरदार पाऊस, कुठे कडाक्याची थंडी? अलर्ट बघाच!

चार वर्षांच्या प्रेमसंबंधांचा शेवट

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लॉजमध्ये धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर गोकुळ कृष्ण याला हत्येच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून घटनास्थळावरील पुरावे आणि इतर बाबींची तपासणी केली जात आहे. चार वर्षांच्या प्रेमसंबंधांचा शेवट अशा दुर्दैवी घटनेत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.