Crime News : पती-पत्नीच्या नातं हे केवळ शरीरसंबंधापर्यंतच मर्यादित नसते. त्यापुढे जाऊन पती-पत्नीचं नातं एकमेकांना आयुष्यभर साथ देण्यासाठी असतं. महिलेच्या शरीराची भूक भागली नाही,तर ती अवैध संबंध ठेवते असे आपण अनेकदा ऐकलं असेल. पण एका महिलेनं थेट आपल्या पतीची हत्या केली आहे. ही घटना दिल्लीतील निहाल विहार परिसरात घडली आहे. वय वर्षे 25 असणाऱ्या टोकाची भूमिका घेतली आहे. या घटनेनं आणि महिलेच्या कृत्याने दिल्लीतील निहार विहार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 20 जुलै रोजी दुपारी 4.15 वाजता घडली आहे.दरम्यान, पतीचं नाव मोहम्मद शाहिद असे आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mumbai Crime : शिक्षिका विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये घेऊन जायची अन् पाजायची दारू, ड्रग्ज नंतर...न्यायालयाचा धक्कादायक निर्णय
काय घडलं?
चौकशीदरम्यान, पत्नीनं या घडलेल्या घटनेत आपणच पतीचा खून केल्याचा कबुलीनामा दिला आहे. पतीसोबत पत्नी लैंगिकदृष्ट्या समाधानी नव्हती. तिनं आरोप केला की, पती मोहम्मद शाहिद हा ऑनलाईन पत्ते खेळायचा. कारण त्यावर मोठा कर्जाचा बोजा होता. इतकंच नाही,तर तिने पतीवर बरेलीत घडलेल्या घटनेप्रमाणेच चुलत भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे.
पतीच्या मृत्यूचं कारण लपवण्याचा केला प्रयत्न
संबंधित हत्येच्या घटनेनं, महिलेनं सांगितलं की, त्यांनी पावरच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यानंतर तो बेशुद्ध पडल्याचं सांगितलं. ज्यामुळे संबंधित पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला होता. परंतु पोलिसांना महिलेच्या जबाबात काहीतरी काळं बेरं असल्याचा संशय व्यक्त केल्याने हे प्रकरण उघडकीस आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत, महिलेनं घर स्वच्छ केलं होतं. तिने अनेकदा पुरावे मिटवण्याचा प्रयत्नही केला परंतु ते पुरावे मिटवता आलेच नाहीत.
हेही वाचा : मुंबई हादरली! बापासह दोन भावांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले, तब्बल...महिने भयंकर कृत्य
पोलिसांनी बरेलीला पथक रवाना करण्यास सांगितले होते. त्या ठिकाणी शाहिदच्या चुलत भावाची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात डीसीपी सचिन शर्मा म्हणाले की, हे प्रकरण अधिकच संवेदनशील आणि गोंधळ निर्माण करणारे आहे. महिलेनं तिच्या जबाबात स्वत:ला निर्दोष दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु फॉरेन्सिक टीम आणि सुरूवातीच्या वैद्यकीय अहवालानतून सत्य समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
