Crime News : मुलीचं आणि लेकीचं नातं हे पवित्र नातं असतं. वडील आपल्या जन्म दिलेल्या मुलीवर कधीच हात उगारत नाही. प्रत्येक वडिलांची लेक ही लाडकीच असते. पण, याच एका लाडक्या लेकीने म्हणजेच तरुणीने आपल्याच वडिलांच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करत हत्या केली. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री वडील झोपलेले असताना मुलीने तिच्या वडिलांची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बिहारच्या बोधगया पोलीस ठाणे परिसरातील मानकोसी गावातील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड हादरलं! मध्यरात्री तरुण मित्रासोबत होता घाटात, नंतर काहीतरी बिनसलं? गल्लीतल्या मित्रानेच केले सपासप वार
सर्व गाढ झोपले अन् लेकीनंच वडिलांच्या डोक्यात हातोडा घातला
रात्रीच्या वेळी जेवण करून कुटुंबातील सर्व सदस्य झोपले होते. तिच संधी साधत मुलीने वडिलांच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करत हत्या केली. दरम्यान, मृत वडिलांचे कपिल मेस्त्री ( वय 70) असे नाव आहे. तर हत्या करण्यात आलेल्या मुलीचं कांचन (वय 30) असे नाव आहे. पोलिसांनी तिला घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. यासोबत मृतदेहाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गावकऱ्यांचा धक्कादायक दावा
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेली आरोपी तरुणी कांचनचं कुटुंब तिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याने घरात बेड्या घालून ठेवायचे, त्यामुळेच तिने वडिलांनी हत्या केली काय? असा प्रश्नही उपस्थित होतोय. मृत वडिलांचा भाऊ म्हणजेच तरुणीचा काका परशुराम कुमार म्हणाला, आमच्या बहिणीचा विवाह हा 2008 मध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झाला होता. तिने यापूर्वीही असे अनेक गुन्हे केले आहेत.
हे ही वाचा : दोन्ही भावांनी टॉवेलनं महिलेचा गळा आवळला, नंतर पतीच्या डोळ्यादेखतच पत्नीची अब्रु लुटली, नेमकं काय घडलं?
आरोपी मुलाने सुमारे चार वर्षांपूर्वी तिच्या तान्ह्या मुलाची आणि इतरांची हत्या केली. या प्रकरणात, बोधगया पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
